साध्वी कनकप्रभाजी यांचे नागपुरात आगमन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 10, 2021 04:08 IST2021-04-10T04:08:39+5:302021-04-10T04:08:39+5:30
साध्वी श्रीजी यावेळी म्हणाल्या, नागपूर हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. येथे समर्पित कार्यकर्ता आहेत आणि प्रेक्षा ध्यान नियमित चालत असते. ...

साध्वी कनकप्रभाजी यांचे नागपुरात आगमन
साध्वी श्रीजी यावेळी म्हणाल्या, नागपूर हे श्रद्धेचे क्षेत्र आहे. येथे समर्पित कार्यकर्ता आहेत आणि प्रेक्षा ध्यान नियमित चालत असते. येथे आध्यात्मिक पुस्तकांचे वाचनालय आहे, जे शुभ संकेत आहे. पुस्तका माैल्यवान रत्नांपेक्षा अनमाेल असतात. अधिकाधिक लाेकांनी त्यांचा अभ्यास करणे गरजेचे आहे. साध्वी श्रीजी यांच्या शुभ आगमनप्रसंगी सभा उपाध्यक्ष विजय रांका, मंत्री राकेश धाडेवा, कोषाध्यक्ष पवन जैन, शांतिलाल पारख, अनिल छाजेड, विकास बुचा, मुकेश बुचा, तेयुप अध्यक्ष महेंद्र आंचलिया, मंत्री मोहित बोथरा, टीपीएफ मंत्री नितिन नखत, महिला मंडळमंत्री सरिता डागा, प्रचारमंत्री सुमन डागा आणि कन्या मंडळ प्रभारी चित्रा बैद व संयोजिका रिया बुच्चा, सलोनी, प्रज्ञा, जैना, बुलबुल व ज्ञानशाळेच्या मुख्य प्रशिक्षका अरुणा नखत, मीडिया प्रभारी प्रेमलता सेठिया प्रामुख्याने उपस्थित हाेते.