नागपुरात एटीएम मशीनची तोडफोड करणारा गजाआड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2020 00:31 IST2020-07-26T00:30:19+5:302020-07-26T00:31:27+5:30
रोकड चोरण्यासाठी एटीएम मशीनची तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली.

नागपुरात एटीएम मशीनची तोडफोड करणारा गजाआड
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : रोकड चोरण्यासाठी एटीएम मशीनची तोडफोड करणाऱ्या एका आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी अटक केली. निखिलेश ऊर्फ निप्पो संतोष उके ( वय ३०) असे आरोपीचे नाव असून, तो श्यामनगरातील जय हिंद सोसायटीत राहतो. मनीषनगरात पंजाब नॅशनल बँकेच्या शाखेला लागूनच एटीएम आहे. रोकड चोरण्याचे हेतूने आरोपीने एटीएम मशीन तोडली.
चंद्रशेखर नामदेव बारापात्रे यांनी शुक्रवारी बेलतरोडी पोलिसांकडे ही तक्रार नोंदविली. ठाणेदार विजय आकोत यांनी लगेच घटनास्थळ गाठून तेथील सीसीटीव्ही फूटेज ताब्यात घेतले. त्यात तोडफोड करणारा कैदी दिसत होता. त्यामुळे त्या छायाचित्राशी साम्य असलेल्या गुन्हेगारांचा अहवाल बेलतरोडी पोलिसांनी बाहेर काढला. एटीएम तोडणारा आरोपी निप्पो उकेसारखा दिसत असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याने गुन्ह्याची कबुली दिल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.