कुख्यात डांगी माउझरसह जेरबंद
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 16, 2021 04:09 IST2021-04-16T04:09:12+5:302021-04-16T04:09:12+5:30
गोधणी मार्गावरील माता नगरात राहणारा अजय अनिल शाहू (वय २१) हा त्याच्या घरासमोर बुधवारी कार धुत होता. तेवढ्यात ओमनगरात ...

कुख्यात डांगी माउझरसह जेरबंद
गोधणी मार्गावरील माता नगरात राहणारा अजय अनिल शाहू (वय २१) हा त्याच्या घरासमोर बुधवारी कार धुत होता. तेवढ्यात ओमनगरात राहणारा डांगी त्याच्या वाहनाने आला. तू रस्त्यात कार का धुतो, कशाला रस्ता अडवला, असे विचारत डांगीने शाहूसोबत वाद घातला. यानंतर पुन्हा काही वेळाने डांगी त्याच्या ॲक्टिव्हावर आला आणि त्याने शाहूला शिवीगाळ करीत त्याच्यावर पिस्तूल ताणले. जास्त बोलशील तर उडवून देईन, अशी धमकीही दिली. शाहूचे नातेवाईक धावत आल्यानंतर आरोपी पळून गेला.
शाहूने मानकापूर ठाण्यात तक्रार नोंदवली. ठाणेदार वैजयंती मांडवधरे यांनी आपल्या सहकाऱ्यांसह धावपळ करून डांगीला जेरबंद केले. त्याच्याकडून पिस्तूल आणि एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. डांगीविरुद्ध यापूर्वीही अनेक ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. पोलीस त्याचा तपास करीत आहेत.
----