बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक देणाऱ्या संस्थाचालकास अटक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2020 22:12 IST2020-10-19T22:08:28+5:302020-10-19T22:12:10+5:30
Illegal adoption, Arrested, Nagpur News दिशाभूल केल्यानंतर बेकायदेशीररित्या दत्तक देऊन मातेला ताल्हुल्या बाळापासून विरक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकास बुटीबोरी पोलीसांनी अटक करून, माय-लेकाची भेट घडविण्यात आली आहे.

बाळाला बेकायदेशीररित्या दत्तक देणाऱ्या संस्थाचालकास अटक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : दिशाभूल केल्यानंतर बेकायदेशीररित्या दत्तक देऊन मातेला ताल्हुल्या बाळापासून विरक्त करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संस्थाचालकास बुटीबोरी पोलीसांनी अटक करून, माय-लेकाची भेट घडविण्यात आली आहे.
सदर महिलेचे हैद्राबाद येथील नरेश चिकटे या युवकाशी लग्न झाले. कोरोना प्रादुभाव आणि टाळेबंदीमुळे या दाम्पत्याने नागपूर गाठले व बुटीबोरी येथील घरी आले. नरेशला दारूचे व्यसन असल्याने तो नेहमी पत्नीस मारझोड करत होता. या संबंधिची तक्रार महिलेने बुटीबोरी पोलीसात दाखल केल्याने नरेशने पत्नीस घराबाहेर काढले. विशेष म्हणजे ती यावेळी सहा महिन्याची गर्भवती होती. अशा अडत्या काळात बुटीबोरी येथील एका महिलेने तिच्या भोजनालयात प्रसती होईपर्यंत तिला आधार दिला. त्यानंतर साथ फाऊंडेशनचा अध्यक्ष प्रयाग डोंगरे याच्याशी महिलेचा परिचय झाला आणि त्याच्याच मार्गदर्शनात ती पुनर्जन्म आश्रमात राहू लागली. दोन महिन्यानंतर आधार कार्ड काढण्याच्या बहाण्याने प्रयागने महिलेलया नागपुरात आणून बेकायदेशीररित्या बाळ दत्तक देण्याचे पत्र तयार करवून घेतले आणि परस्पर एका दात्मत्यास बाळ दत्तक देऊन माय-लेकाची ताटातूट केली. या संदर्भातील माहिती मिळताच वर्धा येथील चाईल्ड लाईनने संबंधित महिलेला हजर करत आपबिती जाणून घेण्यात आली. त्याअनुषंगाने प्रयाग डोंगरेवर बुटीबोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करून बाल कल्याण समीतीने जिल्हा बाल संरक्षण अधिकारी नागपूर यांना प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले. बुटीबोरी पोलीसांनी डोंगरेला अटक केली आहे. चाईल्ड लाईन वर्धाचे जिल्हा समन्वयक आशिष मोडक, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण व चाईल्ड लाईन नागपूर, जिल्हा बाल संरक्षण कक्ष वर्धा, सखी वन स्टॉप सेंटर यांच्या प्रयत्नाने बाळापासून दुरावलेल्या मातेची भेट घडली आहे.