चाेरट्यांचा बंदाेबस्त करा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 25, 2021 04:12 IST2021-08-25T04:12:28+5:302021-08-25T04:12:28+5:30
खापरखेडा/काटाेल : चाेरट्यांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी घरफाेडी करीत खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथून ...

चाेरट्यांचा बंदाेबस्त करा
खापरखेडा/काटाेल : चाेरट्यांनी ग्रामीण भागात धुमाकूळ घातला आहे. त्यांनी घरफाेडी करीत खापरखेडा पाेलीस ठाण्याच्या हद्दीतील दहेगाव (रंगारी) येथून दोन लाख ३८ हजार ३०० रुपयांचा, तर काटाेल शहरातून ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल लंपास केला. चाेरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिक हैराण झाले असून, चाेरट्यांचा बंदाेबस्त करण्याची मागणीही केली जात आहे.
राेशनी राजेंद्रसिंग ठाकूर (३०, रा. दहेगाव रंगारी, ता. सावनेर) या साेमवारी (दि. २३) रक्षाबंधनानिमित्त पाटणसावंगी (ता. सावनेर) येथे गेल्या हाेत्या. दरम्यान, घरी कुणीही नसल्याचे पाहून चाेरट्याने दाराची कडी व कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने दोन लाख २३ हजार ३०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व १५ हजार रुपये राेख असा एकूण दोन लाख ३८ हजार ३०० रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला. घरी चाेरी झाल्याचे लक्षात येताच त्यांनी पाेलिसांत तक्रार दाखल केली.
घरफाेडीची दुसरी घटना काटाेल शहरात घडली. त्र्यंबक नामदेवराव बकाल (४५, रा. गुप्ता लेआउट, काटाेल) हे त्यांच्या कुटुंबीयांसह शनिवारी (दि. २१) बाहेरगावी गेले हाेते. घरी कुणीही नसल्याचे लक्षात येताच चाेरट्याने दाराचे कुलूप ताेडून आत प्रवेश केला. यात त्याने कपाटातील २५ हजार रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व दहा हजार रुपये राेख असा एकूण ३५ हजार रुपयांचा मुद्देमाल चाेरून नेला.
ही बाब लक्षात येताच त्र्यंबक बकाल यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. या दाेन्ही घटनांमध्ये चाेरट्यांनी दोन लाख ४८ हजार ३०० रुपये किमतीचे साेन्या-चांदीचे दागिने व २५ हजार रुपये राेख असा एकूण दोन लाख ७३ हजार ३०० रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. याप्रकरणी खापरखेडा व काटाेल पाेलिसांनी भादंवि ४५४, ४५७, ३८० अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनांचा पुढील तपास अनुक्रमे पाेलीस उपनिरीक्षक मिश्रा व पाेलीस नाईक ज्याेती सेवतकर करीत आहेत.