शहरं
Join us  
Trending Stories
1
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
2
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
3
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
4
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
5
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
6
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
7
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
8
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
9
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
10
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
11
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
12
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
13
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
14
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
15
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना
16
काश्मीरमध्ये निवडणुकीपूर्वी दुहेरी हल्ला; भाजपच्या माजी सरपंचाची गोळ्या झाडून हत्या
17
दिल्लीत महाभ्रष्टाचाऱ्याला इंडी आघाडीने स्वीकारले; काँग्रेसला ४ जागाही लढवता आल्या नाहीत, मोदींचा हल्लाबोल 
18
आजचे राशीभविष्य - १९ मे २०२४, अचानक धनलाभाची शक्यता,व्यावसायिक क्षेत्रात लाभ होतील
19
'हार मानणार नाही..'; कार्तिक आर्यनच्या 'चंदू चँपियन'चा ट्रेलर, मराठमोळ्या हेमांगी कवीने वेधलं लक्ष
20
मविआ राज्यात ४६ जागा जिंकणार; काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी व्यक्त केला विश्वास

आर्णी ते दीक्षाभूमी :  'समतेचे महाकाव्य' साकारण्यासाठी सायकल रॅली 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 01, 2020 12:23 AM

महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.

ठळक मुद्देअकोला जिल्ह्यातील अधिकाऱ्यांचे अभियान

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनकार्यावर आधारीत पाच हजार कवितांचा संग्रह ‘समतेचे महाकाव्य’ म्हणून प्रसिद्ध होणार आहे. यासाठी अकोला जिल्ह्यातील विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी पुढाकार घेतला असून हा पण पूर्ण करण्यासाठी आर्णी ते दीक्षाभूमी सायकल रॅली काढण्यात आली.आर्णीपासून २०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करीत शुक्रवारी दीक्षाभूमीवर पोहचलेल्या या बहाद्दरांनी लोकमतशी संवाद साधला. या अभियानात अकोल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले, जिल्हा खनिकर्म अधिकारी डॉ. अतुल दोड, तहसीलदार राहुल तायडे, तहसिलदार विजय लोखंडे, उपशिक्षणाधिकारी प्रकाश अंधारे या पाच अधिकाऱ्यांचा सहभाग आहे. हे पाचही अधिकारी २९ जानेवारीला यवतमाळ जिल्ह्याच्या आर्णी येथून निघाले व पुढे यवतमाळ, कळंब, देवळी, वर्धा या मार्गाने होत दीक्षाभूमीवर पोहचले. यानंतर त्याच्या मार्गाने परत जात सायकलने ४०० किलोमीटरचा प्रवास पूर्ण करणार आहेत. यामध्ये हरिओमसिंह करणसिंग बघेल, प्रमोद बुटले, दीपक हिरोळे, श्रीकृष्णा सोडगीर, सतीश पाचखंडे या पाच नागरिकांचाही समावेश आहे.या महाकाव्यामध्ये डॉ. बाबासाहेबांचे जीवनकार्यावर कवितांचा समावेश असणार आहे. बाबासाहेबांचे बालपण, शिक्षण, त्यांनी केलेला संघर्ष, सुरू केलेली वृत्तपत्र, संस्था, पक्ष, महाड चवदार तळ्याचा सत्याग्रह, काळाराम मंदिर सत्याग्रह, विधिमंडळातील कार्य, संविधान निर्मितीचे कार्य, महिलांकरिता, मजुरांसाठी, विद्यार्थ्यांसाठी केलेले कार्य, राजकीय कार्य आणि बाबासाहेबांचे ग्रंथप्रेम आदी विषयांचा उलगडा महाकाव्यातील कवितांच्या माध्यमातून होणार आहे. केवळ महाराष्ट्रच नाही तर देशभरातील आणि जगभरातील मराठी, हिंदी आणि इंग्रजी या तिन्ही भाषांमधील कविता या महाकाव्यात समाविष्ट करण्यात येणार असल्याचे उपजिल्हाधिकारी राजेश खवले यांनी सांगितले. कवी किंवा कवयित्री एकापेक्षा अधिक कविता पाठवू शकतात. जगातील जास्तीत जास्त कविंनी डॉ. बाबासाहेबांच्या विविध पैलुवर प्रकाश टाकणाऱ्या विविध भाषांमधील कविता पाठवाव्या, असे आवाहन या सायकल रॅलीच्या माध्यमातून करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

टॅग्स :CyclingसायकलिंगDiksha Bhoomi Nagpurदीक्षाभूमी