शहरं
Join us  
Trending Stories
1
Sushila Karki: सुशीला कार्की आहेत तरी कोण? नेपाळच्या पंतप्रधानाच्या शर्यतीत आघाडीवर!
2
डोनाल्ड ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाची गोळ्या झाडून हत्या, विद्यापीठातील कार्यक्रमात घडलेल्या घटनेने अमेरिकेत खळबळ
3
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
4
नेपाळमधील तुरुंगात झालेल्या संघर्षात पाच जणांचा मृत्यू, देशभरातील सुमारे ७००० कैदी फरार
5
आजचे राशीभविष्य- ११ सप्टेंबर २०२५: आजचा दिवस लाभदायी, नियोजित कामे पूर्ण होतील!
6
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
7
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
8
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
9
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
10
‘डीवाय पाटील’ बीकेसीत उभारणार शैक्षणिक संकुल; दहा भूखंड भाडेतत्त्वावर देण्याचा निर्णय
11
‘कोहिनूर’ची ‘बहीण’ ११७ वर्षांनी दिसणार! या बहिणीचं नाव आहे ‘दरिया-ए-नूर’ 
12
भाडेकरार, भाडेवाढीशिवाय घरे रिकामी करणार नाही; नायगाव बीडीडी प्रकल्पग्रस्तांचा म्हाडाला कडक इशारा
13
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
14
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
15
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
16
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
17
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
18
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
19
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
20
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट

आर्मी अधिकाऱ्याच्या बहिणीची २.८७  लाखांनी फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 17, 2020 21:02 IST

Army officer's sister cheated, crime news आर्मीत सेवारत असलेल्या अधिकाऱ्याच्या बहिणीची सायबर गुन्हेगाराने फसवणूक केली. कॅन्सल झालेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती घेऊन आरोपीने त्या खात्यातून २.८७ लाख रुपये काढून घेतले.

ठळक मुद्देकॅन्सल रेल्वे तिकिटाचे निमित्त :घेतली बँक खात्याची माहिती

लोकमत न्यूज नेटवर्क

नागपूर : आर्मीत सेवारत असलेल्या अधिकाऱ्याच्या बहिणीची सायबर गुन्हेगाराने फसवणूक केली. कॅन्सल झालेल्या रेल्वे तिकिटाचे पैसे परत करण्याच्या बहाण्याने बँक खात्याची माहिती घेऊन आरोपीने त्या खात्यातून २.८७ लाख रुपये काढून घेतले. १४ जुलैला घडलेली ही बनवाबनवी लक्षात आल्यामुळे त्यांनी भावाच्या माध्यमातून पोलिसांकडे तक्रार नोंदविली.

गाैरव दिलीप तितरमारे (वय २८) हे सोनेगावला विमानतळानजीकच्या ममता को-ऑपरेटिव्ह सोसायटीत राहतात. ते भारतीय स्थल सेना मथुरा येथे कार्यरत आहेत. त्यांची बहीण श्रद्धा समीर तिजारे (वय ३०) भावनगर, गुजरात येथे राहतात. गाैरव यांनी आपल्या बहिणीला आपल्या बँक खात्यातून ऑनलाईन व्यवहार करायला परवानगी दिलेली आहे. तिजारे यांनी मे २०२० मध्ये आयआरसीटीसी या वेबसाईटवर जाऊन नागपूर ते भावनगर रेल्वेचे तिकीट बुक केले होते. कोरोनामुळे ते तिकीट कॅन्सल झाले. मात्र, तिकिटाची रक्कम परत मिळाली नाही. त्यामुळे श्रद्धा तिजारे यांनी पुन्हा गुुगलवर साईट ओपन करून तिकिटाबाबत विचारणा केली. यावेळी पलीकडून बोलणाऱ्या व्यक्तीने तुमच्या कोणत्या बँक खात्यातून जास्त आर्थिक व्यवहार होतात, असा प्रश्न केला. श्रद्धा तिजारे यांनी आरोपीला स्टेट बँकेच्या जयप्रकाशनगर शाखेचा क्रमांक दिला. आरोपीने १४ जुलैला दुपारी २ च्या सुमारास त्या खात्यातून २ लाख ७८ हजार २२९ रुपये आपल्या खात्यात ऑनलाईन ट्रान्सफर करून घेतले. अलीकडे ही बनवाबनवी लक्षात आली. श्रद्धा यांनी भाऊ गाैरव यांना ही माहिती दिली. गाैरव यांनी सायबर शाखेत तक्रार नोंदविली. याप्रकरणी सोनेगाव ठाण्यात बुधवारी गुन्हा दाखल करण्यात आला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइमnagpurनागपूर