शहरं
Join us  
Trending Stories
1
Heatwave Alert: सावधान...! उष्णतेच्या लाटेसारखी स्थिती; विदर्भात ४२, मराठवाडा, मध्य महाराष्ट्रात ३८-४० तर कोकणात ३४-३६ अंश सेल्सिअसची नोंद
2
Latest Marathi News LIVE Updates: भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली
3
'या' दिग्गज टेक कंपनीकडून भारतीय कर्मचाऱ्यांना मोठं गिफ्ट: ५ लाखांपासून १ कोटीपर्यंत मिळणार बोनस
4
पाकिस्तान कोणता खेळ खेळतंय? इराण युद्ध काळात तुर्की, सौदी अन् कतारला चाललेत PM शहबाज शरीफ
5
'देखणी नवरी मिळेल' सांगितलं अन् ७ हजार जणांना लुटलं; लोकांना फसवणाऱ्या मॅट्रिमोनियल साईटचा असा झाला गेम!
6
अमरावतीत 'योगी स्टाईल' कारवाई! अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
7
होर्मुझनंतर आता 'मलक्का'वर अमेरिकेची नजर; ट्रम्प यांची नवी खेळी! भारतासाठी ठरणार गेमचेंजर?
8
“सुनेत्रा काकींना ९९% मतदान होईल, अजितदादांना स्मरून मतदान करा”; रोहित पवार प्रचाराला लागले
9
आदित्य ठाकरे आता उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होणार?; संजय राऊतांचे सूचक विधान, चर्चांना उधाण
10
कोविड लसींच्या सक्तीमुळे शेन वॉर्नचा मृत्यू, मुलाचा खळबळजनक दावा
11
Vastu Tips: घरात ठेवलेली रोपं केवळ शोभेची वस्तू नाहीत, ती निर्माण करतात 'लाईव्ह एनर्जी'; वाचा वास्तू रहस्य
12
चीनला इराणकडून तेल खरेदी करू देणार नाही; ट्रम्प यांच्या निकटवर्तीयाने दिली मोठी धमकी
13
मोबाईल दुकानदार होता टार्गेट, बळी गेला व्यापाऱ्याचा; कोल्हापुरात खंडणीसाठी बॅटरीचा शॉक देऊन हत्या
14
पुन्हा इराण युद्धासारखं संकट आलं तरी होणार नाही तेल-गॅसची टंचाई; सरकारचा 'मास्टर प्लॅन', सुरू केली मोठी तयारी
15
IPL 2026: विराट कोहली करणार रोहित शर्माची बरोबरी? RCB vs LSG सामन्यात मिळणार सुवर्णसंधी
16
भीषण अपघात! पंजाबमध्ये भाविकांनी भरलेली बस उलटली; ६ जणांचा मृत्यू, २५ जखमी
17
ट्रम्प यांना बाजूला सारले, युरोपीयन NATO देशांची वेगळी चूल; अमेरिकेला एकटे पाडायची तयारी
18
Bhagwant Mann : "अशोक मित्तल यांच्या घरावरील ED ची रेड ही टिपिकल मोदी स्टाईल"; भगवंत मान यांचा निशाणा
19
अरबी समुद्रात पाकिस्तान करणार होता कुरापती; माहिती मिळताच २४ तासांत भारताने उतरवली युद्धनौका
20
आज सोन्या-चांदीच्या किमतीत किती झाला बदल? ऑल टाईम हायवरुन Silver १,६४,८४४ रुपयांनी खाली; सोन्याची किंमत किती?
Daily Top 2Weekly Top 5

१४ हजार कर्मचाऱ्यांची फौज

By admin | Updated: January 4, 2017 01:56 IST

फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे.

नागपूर : फेब्रुवारी महिन्यात होऊ घातलेल्या महापालिका निवडणुकीसाठी निवडणूक विभाग सज्ज झाला आहे. ३८ प्रभागातून १५१ उमेदवार निवडून द्यावयाचे आहेत. मतदान प्रक्रिया सुरळीत पार पडावी यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी, १२ तहसीलदार व १३ उपजिल्हाधिकारी दर्जाच्या अधिकाऱ्यांची गरज भासणार आहे. तसेच २८०० मतदान केंद्रावर १४ हजार कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात येणार आहे. २०११च्या जनगणनेनुसार नागपूर शहराची लोकसंख्या २४ लाख ४७ हजार ४९४ इतकी आहे. यात अनुसूचित जाती ४ लाख ८० हजार ७५९ तर अनुसूचित जमातीची लोकसंख्या १ लाख ८८ हजार ४४४ इतकी आहे. या आधावर प्रत्येक प्रभागाची सरासरी लोकसंख्या ६४८३४ ठेवण्यात आलेली आहे. निवडणुकीसाठी आवश्यक असलेले अधिकारी व कर्मचारी उपलब्ध करण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगकडे करण्यात आलेली आहे. (प्रतिनिधी) ५० हजार मतदार वाढले सप्टेबर २०१६ पर्यतची मतदार यादी यापूर्वीच जाहीर करण्यात आलेली आहे. गेल्या तीन महिन्यात नागपूर शहरात सुमारे ५० हजार नवीन मतदारांची नावे नोंदविण्यात आलेली आहेत. परंतु निवडणूक विभागाकडून अंतिम मतदार यादी जाहीर केल्यानंतरच शहरातील मतदारांची संख्या स्पष्ट होणार आहे. प्रभागनिहाय मतदार यादी १२ जानेवारीपर्यंत महापालिका निवडणुकीसाठी गुरुवारी ५ जानेवारीला पुरवणी मतदार यादी तर १२ जानेवारीपर्यंत प्रभागनिहाय मतदार यादी जाहीर केली जाणार आहे. यावर १७ जानेवारीपर्यंत आक्षेप स्वीकारण्यात येणार आहे. २५ जानेवारीपर्यंत अंतिम मतदार याची जाहीर केली जाणार आहे. विभागात ४० उपजिल्हाधिकाऱ्यांची कमी नागपूर विभागातील भंडारा व गोंदिया जिल्हा वगळता उर्वरित चार जिल्ह्यातील जिल्हा परिषदा, महापालिकांच्या निवडणुका होत आहेत. यात नागपूर, चंद्रपूर, गडचिरोली व वर्धा जिल्ह्यांचा समावेश आहे. एकाच वेळी निवडणुका होत असल्याने निवडणूक प्रक्रि येसाठी आवश्यक असलेल्या उपजिल्हाधिकारी दर्जाच्या ४० अधिकाऱ्यांची कमी असल्याची माहिती सूत्रांनी दिली.