चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
By दयानंद पाईकराव | Updated: February 24, 2024 18:56 IST2024-02-24T18:56:00+5:302024-02-24T18:56:12+5:30
आरोपीवर गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.

चाकू घेऊन धुमाकुळ घातला, पोलिसांनी तुरुंगात टाकला
नागपूर : चाकू घेऊन शिविगाळ करीत धुमाकुळ घालणाऱ्या आरोपीला बेलतरोडी पोलिसांनी शस्त्रासह अटक करून गजाआड केले आहे. पवन गोपाल मिसाळ उर्फ पवन राजेश आर्या (२०, रा. मनिषनगर बेलतरोडी) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. बेलतरोडी पोलिसांचे पथक शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजताच्या सुमारास गस्त घालत होते. आरोपी मनिषनगर पद्मावती टी पॉईंट येथील केक लिंक दुकानाजवळ सार्वजनिक ठिकाणी हातात चाकू घेऊन धुमाकुळ घालत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.
पोलिसांनी घटनास्थळी जाऊन आरोपीला ताब्यात घेतले. त्याच्या जवळ एक २०० रुपये किमतीचा लोखंडी चाकू आढळला. आरोपीविरुद्ध कलम ४, २५, सहकलम १३५ नुसार गुन्हा दाखल करून त्यास अटक करण्यात आली आहे.