शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

मोठ्या भावाशी वाद, कारमधून आलेल्या आरोपींनी केली धाकट्याची हत्या

By योगेश पांडे | Updated: April 29, 2024 17:25 IST

Nagpur : मोठ्या भावाशी वाद झाल्यानंतर बदला घेण्यासाठी कारमधून आलेल्या चार आरोपींनी धाकट्या भावाची केली हत्या

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : मोठ्या भावाशी वाद झाल्यानंतर बदला घेण्यासाठी कारमधून आलेल्या चार आरोपींनी धाकट्या भावाची हत्या केली. रविवारी रात्री घडलेल्या या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. पारडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली. नागपुरात एकाच रात्री दोन हत्या झाल्याने परत गुन्हेगारीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

रोहन देवीलाल डांगे (२४, गंगाबाग, पारडी) असे मृतकाचे नाव आहे. त्याचा मोठा भाऊ रोहित डांगे (२८) याचा २३ एप्रिल रोजी काही तरुणांशी शुल्लक कारणावरून वाद झाला होता. त्या वादाचा बदला घेण्यासाठी गुन्हेगारी प्रवृत्तीचा नंदकिशोर उर्फ काल्या देविदास कुंभलकर (२७, भवानीनगर, पारडी), गौरव संजय कालेश्वरवार (२७, प्रेमनगर), राज मणिराम कुंटलवार (३१, प्रेमनगर), शुभम कमलकिशोर भेलेकर (२७, रेणुकानगर, गंगाबाग) हे रविवारी रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास इकोस्पोर्ट्स कारने मानकरावाडी मैदान, भवानीनगर येथे पोहोचले. तेथे रोहन हा त्याचा मित्र राज व आनंद यांच्यासोबत गप्पा मारत बसला होता. आरोपींनी त्याला रोहीत कुठे आहे अशी विचारणा केली. त्यानंतर त्यांनी त्याला आत्ताच येथे बोलव असे म्हणत रोहनलाच मारहाण करण्यास सुरुवात केली. काही कळायच्या आतच त्यांनी रोहनच्या पोट, मान, पाठ व छातीवर चाकूने वार केले. त्यात रोहन गंभीर जखमी झाला. त्याच्या मित्रांनी धावत जाऊन रोहीतला याची माहिती दिली. रोहीत तेथे गेला असता आरोपी फरार झाले होते. रोहनला मेयो इस्पितळात नेले असता डॉक्टरांनी मृत घोषित केले. रोहीतच्या तक्रारीवरून पारडी पोलीस ठाण्यात चारही आरोपींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला व त्यांना अटक करण्यात आली.

 

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीDeathमृत्यूnagpurनागपूर