शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

तुम्ही 'कॅल्शियम कार्बाइड'ने पिकवलेले आंबे तर खात नाही ना?

By सुनील चरपे | Updated: May 5, 2025 12:04 IST

ओळखायचे कसे : खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी

सुनील चरपेनागपूरआंबा दिसला की तो खाण्याची कुणालाही इच्छा होते. बहुतांश ग्राहक चमकदार व आकर्षक दिसणारे आंबे खरेदी करण्यावर अधिक भर देतात. इथेच त्यांची गफलत होते. पक्व झालेले कच्चे आंबे पिकवण्यासाठी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेट तसेच इथिलीनचा मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो. या रसायनांनी पिकवलेले आंबे ओळखायचे कसे?

आंबे पिकण्यासाठी स्वतः मध्ये आइथिलीन वायू तयार करतात व वातावरणात सोडतात. हा वायू खूपच हलका असल्याने लवकर उडतो. तो उडून जाऊ नये म्हणून पूर्वी आंबे झाडांची पाने, वाळलेले गवत अथवा कपड्यांनी झाकून ठेवले जायचे. हा वायू मानवी आरोग्यास अपायकारक नसल्याने सरकारने आंबे पिकवण्यासाठी विशिष्ट प्रमाण व योग्य पद्धतीने इथ्रेल व इथेफॉन वापरण्याला परवानगी दिली आहे. याचा वापर रायपनिंग चेंबरमध्ये केला जातो. याचे द्रावण आंब्यावर फवारणे घातक असते. ते रायपनिंग चेंबरमधील हवेत फवारावे लागते, अशी माहिती कृषी शास्त्रज्ञ डॉ. भगवान कापसे यांनी दिली.

आंबे लवकर पिकवण्यासाठी व्यापारी कॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटच्या पुड्या आंब्याच्या ढिगात ठेवतात. या दोन्ही रसायनांपासून अॅसिटिलीन वायू तयार होतो. हा वायू 'डी-ग्रीनिंग' असल्याने फळांना २४ ते ३६ तासांत पिवळा रंग प्राप्त होतो, असेही डॉ. भगवान कापसे यांनी सांगितले. हे रसायन 'चायना पुडी' नावाने बाजारात ओळखले जात असले, तरी त्याचा चीनसोबत संबंध नाही. इथ्रेल किंवा इथेफॉनच्या पुड्या आंब्यांमध्ये ठेवतात. त्या आंब्याच्या थेट संपर्कात येत असल्याने घातक ठरू शकते.

आर्सेनिकचे प्रमाण वाढण्याची शक्यताकाही व्यापारी कॅल्शियम कार्बाइडची पावडर आंब्यावर टाकतात. कॅल्शियम कार्बाइडमध्ये आर्सेनिक व फॉस्फरसचे घटक असतात. आंबे पिकवल्यावर ते फळात राहू शकतात. कॅल्शियम कार्बाइडने पिकवलेल्या फळांमध्ये आर्सेनिकचे प्रमाण वाढू शकते. आर्सेनिक विषारी असल्याने ते मानवी आरोग्यासाठी हानिकारक ठरते. कॅल्शियम कार्बाइडच्या धुरामुळे माणसांची दृष्टी जाण्याची शक्यता असते.

कॅल्शियम कार्बाइड किंवा कार्बोनेटने पिकवलेले आंबेकॅल्शियम कार्बाइड किंवा कॅल्शियम कार्बोनेटने पिकवलेल्या आंब्यांची साल वरून चमकदार असते. संपूर्ण साल एकसारखी पिवळीधम्मक दिसते. हे आंबे नरम नसतात. त्यांचा सुगंध येत नाही. वास घेतल्यास नाकाला चुरचूर होते. तीन चार दिवसांत आंब्यांवर काळे डाग पडतात.

"आंब्यांना घनता (ग्रॅव्हिटी) असते. एकपेक्षा जास्त घनता असल्यास ते पाण्यात बुडतात. एक किंवा एकपेक्षा कमी घनता असेल तर ते आंबे पाण्यावर तरंगतात. यावरून आंबे नेमके कशाने पिकवलेले आहेत, ते ओळखणे कठीण जाते."- डॉ. भगवान कापसे, कृषी शास्त्रज्ञ

"आम्ही आंबे पिकवण्यासाठी हळद व वेखंड वापरतो. एक लिटर पाण्यात प्रत्येकी पाच ग्रॅम हळद व वेखंड मिसळतो. त्या द्रावणात १० मिनिटे आंबे बुडवून बाहेर काढतो. ते न पुसता कोरडे झाल्यावर पिकायला ठेवतो. आठ ते दहा दिवसात आंबे पिकतात व चांगला गोडवा येतो."- किशोर सरोदे, आंबा उत्पादक, सिंधू फार्म, यवतमाळ

 

टॅग्स :MangoआंबाHealth Tipsहेल्थ टिप्सfoodअन्नnagpurनागपूर