शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : राज्यात तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात; पवार, राणे, उदयनराजेंची प्रतिष्ठा पणाला
2
तिसऱ्या टप्प्यात राजे अन् घराण्यांची अस्मितेची लढाई; आज ११ मतदारसंघांसाठी होतेय मतदान  
3
रोहित पवार यांनी केलेल्या पैसे वाटपाच्या आरोपांना अजित पवार यांचं प्रत्युत्तर, म्हणाले…
4
पुढील टप्प्यांत काँग्रेसची खरगे, प्रियांकांवर भिस्त; राहुल गांधींची महाराष्ट्रात यापुढे एकही सभा नियोजित नाही
5
Raymond Gautam Singhania : "माझ्या खासगी जीवनाचा व्यवसायाशी..," वडील-पत्नीशी वाददरम्यान गौतम सिंघानियांचं मोठं वक्तव्य
6
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
7
शरद पवारांकडे स्वाभिमान तर अजितदादांकडे अहंकार; रोहित पवारांची बोचरी टीका
8
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
9
Met Gala 2024: आलिया भटच्या 'देसी लूक'ने वेधलं लक्ष, सब्यसाची साडीत दिसली जणू राजकुमारी
10
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
11
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
12
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
13
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
14
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
15
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
16
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
17
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
18
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
19
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
20
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा

एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला ग्राहक मंचचा दणका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 15, 2020 1:02 AM

तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे.

ठळक मुद्देग्राहकाचे २३ हजार रुपये १२ टक्के व्याजासह परत द्या

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : तक्रारकर्त्या ग्राहकाचे २३ हजार १७० रुपये १२ टक्के व्याजासह परत करावे असा आदेश अतिरिक्त जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचने एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीला दिला आहे. व्याज २६ मे २०१६ ते प्रत्यक्ष रक्कम अदा करण्याच्या तारखेपर्यंत लागू करण्यात आले. तसेच, ग्राहकाला शारीरिक-मानसिक त्रासाकरिता ५ हजार व तक्रारीच्या खर्चापोटी ३ हजार रुपये भरपाई मंजूर करण्यात आली. सदर रक्कमही कंपनीनेच द्यायची आहे.दीपेश उत्तमनी असे ग्राहकाचे नाव आहे. त्यांच्या तक्रारीवर मंचच्या पीठासीन सदस्या स्मिता चांदेकर व सदस्य अविनाश प्रभुणे यांनी हा निर्णय दिला. निर्णयावर अंमलबजावणी करण्यासाठी कंपनीला एक महिन्याची मुदत देण्यात आली आहे. तक्रारीतील माहितीनुसार, उत्तमनी यांनी २२ आॅगस्ट २०१५ रोजी न्यू शरण मोबाईल गॅलरीमधून ५५ हजार रुपयाचा मोबाईल खरेदी केला होता. तसेच, एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीकडून मोबाईलचा विमा काढला होता. त्याकरिता कंपनीकडे २००० रुपये प्रीमियम जमा केले होते. १५ एप्रिल २०१६ रोजी तो मोबाईल खाली पडला. त्यामुळे मोबाईलचे नुकसान झाले. उत्तमनी यांनी सर्व्हिस सेंटरला लगेच घटनेची माहिती दिली. तसेच, मोबाईल हॅण्डसेट बदलवून मिळण्याकरिता एपीपीएस डेली सोल्युशन कंपनीकडे दावा दाखल केला. त्यानंतर कंपनीच्या सूचनेनुसार नवीन हॅण्डसेटच्या वाढीव किमतीचे २३ हजार १७० रुपये जमा केले. कंपनीने ही रक्कम परत करण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतर कंपनीने उत्तमनी यांच्या दाव्यावर निर्णय घेतला नाही व संबंधित रक्कमही परत केली नाही. त्यामुळे उत्तमनी यांनी कंपनीला कायदेशीर नोटीस बजावली. कंपनीने त्यालाही उत्तर दिले नाही. परिणामी, उत्तमनी यांनी ग्राहक मंचमध्ये तक्रार दाखल केली होती. मंचने ती तक्रार अंशत: मंजूर केली.

टॅग्स :Nagpur District Consumer Forumनागपूर जिल्हा ग्राहक तक्रार निवारण मंचOrder orderआदेश केणे