कोराडी मंदिराच्या विकास आराखड्यास मंजुरी

By Admin | Updated: June 13, 2017 01:53 IST2017-06-13T01:53:03+5:302017-06-13T01:53:03+5:30

कोराडी देवी मंदिर विकास प्रकल्पाच्या सुधारित विकास आराखड्याला सोमवारी पर्यटन समितीने मंजुरी दिली.

Approval of development plan of Koradi temple | कोराडी मंदिराच्या विकास आराखड्यास मंजुरी

कोराडी मंदिराच्या विकास आराखड्यास मंजुरी

पालकमंत्र्यांची माहिती : जिल्हा पर्यटन समितीची बैठक
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : कोराडी देवी मंदिर विकास प्रकल्पाच्या सुधारित विकास आराखड्याला सोमवारी पर्यटन समितीने मंजुरी दिली. तसेच न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे कोणतीही विकास कामे थांबणार नसल्याची माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली.
जिल्हा पर्यटन समितीची बैठक नासुप्रच्या सभागृहात आढावा बैठक पार पडली. या बैठकीला जिल्हाधिकारी सचिन कुर्वे, नासुप्र सभापती डॉ. दीपक म्हैसेकर, सीईओ कादंबरी बलकवडे, मंदिर समितीचे सचिव केशव फुलझेले, विश्वस्त दयाराम तडसकर, बाबुराव भोयर, प्रेमलाल पटेल व अन्य विश्वस्त उपस्थित होते. सुधारित आराखड्याचा प्रस्ताव शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात येईल, असेही यावेळी सांगण्यात आले. कोराडी मंदिर विकास प्रकल्पाचा मूळ आराखडा १८४ कोटींचा असून, वाढीव किमतीसह सुधारित आराखडा २०१ कोटींचा झाला आहे तसेच टप्पा-२ चा आराखडा ९८ कोटींचा आहे. विकास कामे करताना संरक्षण विभागाच्या जागेचा प्रश्न निर्माण झाला होता. यासंदर्भात कोराडी ग्रामपंचायतने न्यायालयात याचिका दाखल केली होती. या याचिकेवर उच्च न्यायालयाने १२ मे २०१७ रोजी आदेश देऊन जागेच्या प्रश्नासाठी कोणतीही विकास कामे थांबवू नयेत, असा निर्णय दिला आहे. संरक्षण विभाग आणि शासन यांचा जागेच्या हस्तांतरणाचा प्रश्न सुटत राहील, पण कामे थांबणार नाहीत. न्यायालयाच्या निर्णयाप्रमाणे आता भाविक व पर्यटकांसाठी निर्माण करण्यात येणाऱ्या सुविधा व विकास कामे थांबणार नाहीत.
म्युझियम (संग्रहालय) आणि सभामंडपाचा नवीन प्रस्ताव शासनाकडे पाठविण्यात येणार आहे. याशिवाय रस्ते, बसस्टॅण्ड, शॉपिंग कॉम्प्लेक्स ही कामे सुरू आहेत. तसेच कोराडी मंदिराकडे जाणाऱ्या कालव्यावर स्लॅब टाकून भाविकांसाठी रस्ता करण्यात येणार आहे. या रस्त्याच्या शेजारी सोलरचे पॅनेल उभे करून मंदिराचा परिसर सोलरवर आणण्यात येणार आहे. ही सर्व कामे गतीने व्हावीत म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचा एक अभियंता घेण्यात येईल. विकास आराखड्यातील १५० कोटींच्या कामाचे कार्यादेश देण्यात आले असून, ३५ कोटींच्या कामांच्या निविदा काढण्यात आल्या आहेत.

Web Title: Approval of development plan of Koradi temple

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.