नागपूरच्या डॉ.रामदास आत्राम यांची महू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 24, 2023 22:27 IST2023-01-24T22:27:22+5:302023-01-24T22:27:46+5:30

Nagpur News नागपूरच्या शासकीय न्यायवैद्यकशास्त्र संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांची डॉ.बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महू येथील कुलगुरुपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.

Appointment of Dr. Ramdas Atram of Nagpur as Vice-Chancellor of Mahu University | नागपूरच्या डॉ.रामदास आत्राम यांची महू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

नागपूरच्या डॉ.रामदास आत्राम यांची महू विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती

नागपूर : नागपूरच्या शासकीय न्यायवैद्यकशास्त्र संस्थेचे संचालक डॉ.रामदास आत्राम यांची डॉ.बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठ, महू येथील कुलगुरुपदावर नियुक्ती करण्यात आली आहे.  डॉ.आत्राम यांच्या नियुक्तीने नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे.

डॉ.आत्राम हे शासकीय विज्ञान संस्थेचे संचालक होते. त्यानंतर, आता न्यायवैद्यकशास्त्र संस्थेचे संचालक म्हणून नियुक्ती देण्यात आली. मध्य प्रदेशचे राज्यपालांनी मंगळवारी परिपत्रक जाहीर करून, त्यांनी महू येथील डॉ.बी.आर. आंबेडकर सामाजिक विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरुपदी नियुक्ती करण्यात आल्याचे जाहीर केले. डॉ.आत्राम नागपूर विद्यापीठाच्या अधिसभेचे सदस्यही आहेत.

Web Title: Appointment of Dr. Ramdas Atram of Nagpur as Vice-Chancellor of Mahu University