हाऊसकीपिंगच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधींचा चुना, गरज नसताना सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2019 05:01 AM2019-09-30T05:01:28+5:302019-09-30T05:01:46+5:30

रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूरवरून रात्री सुटणा-या आणि सकाळी पुणे, मुंबईत पोहोचणा-या रेल्वेगाड्यात ‘आॅन बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ची (ओबीएचएस) गरज नाही.

appointment of cleaning staff when not needed in railway | हाऊसकीपिंगच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधींचा चुना, गरज नसताना सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

हाऊसकीपिंगच्या नावाखाली रेल्वेला कोट्यवधींचा चुना, गरज नसताना सफाई कर्मचाऱ्यांची नियुक्ती

Next

- दयानंद पाईकराव
नागपूर : रेल्वेत प्रत्येक कामाचे कंत्राट देण्याचा सपाटा सुरू आहे. यात नागपूरवरून रात्री सुटणा-या आणि सकाळी पुणे, मुंबईत पोहोचणा-या रेल्वेगाड्यात ‘आॅन बोर्ड हाऊसकीपिंग सर्व्हिसेस’ची (ओबीएचएस) गरज नाही. परंतु नागपूर विभागात त्यासाठी कोट्यवधी रुपयांचे कंत्राट देण्यात आले आहे. हा रेल्वेच्या पैशांचा गैरवापर असून यात अधिकारी आणि कंत्राटदारांचा फायदा होत असल्यामुळे असे कंत्राट देण्यात येत असल्याची चर्चा रेल्वे कर्मचाऱ्यांमध्ये आहे.
नागपूर-पुणे गरीबरथ एक्स्प्रेस, नागपूर-पुणे एक्स्प्रेस, नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस दुरांतो एक्स्प्रेस, अजनी-लोकमान्य टिळक टर्मिनस एक्स्प्रेस, अजनी-पुणे, नागपूर-छत्रपती शिवाजी टर्मिनस सेवाग्राम एक्स्प्रेस या गाड्यात ‘ओबीएचएस’कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात आली आहे. यात नागपूर रेल्वे स्थानकासाठीचे कंत्राट पीयूष ट्रेडर्सला तर अजनीचे कंत्राट निम्बस कंपनीला देण्यात आले आहे. नागपूरवरून सुटणाºया रेल्वेगाड्यांची योग्य प्रकारे सफाई करूनच त्या प्लॅटफॉर्मवर लावण्यात येतात. पीट लाईनवर या गाड्या चांगल्या प्रकारे धुतल्यानंतर त्या प्रवासासाठी उपलब्ध करून देण्यात येतात. रात्री प्रवासी या गाड्यात बसतात आणि थोड्या वेळात झोपी जातात. त्यामुळे या गाड्यात घाण होण्याची शक्यता उरत नाही. तरीसुद्धा रेल्वेने गाड्यांच्या सफाईसाठी कोट्यवधीचे कंत्राट दिल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. एखादी गाडी २८ ते ३० तास प्रवास करीत असल्यास कचरा होण्याची शक्यता आहे. परंतु १२ ते १४ तासाच्या अंतरात आणि ते सुद्धा रात्रीच्या प्रवासात कचरा होण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

‘रात्री उशिरा सुटून सकाळी पोहोचणाºया रेल्वेगाड्यात ‘ओबीएचएस’ची गरज नाही. परंतु अशा गाड्यात जर सफाई कर्मचाºयांची नियुक्ती करण्यात येत असल्यास ते रेल्वेच्या संपत्तीचे नुकसान आहे. त्यामुळे रेल्वे प्रशासनाने असे कंत्राट त्वरित रद्द करण्याची गरज आहे.’
-हबीब खान, विभागीय सचिव, नॅशनल रेल्वे मजदूर युनियन, नागपूर विभाग.

Web Title: appointment of cleaning staff when not needed in railway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.