शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

शिवकुमार जयस्वाल यांची चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी नियुक्ती करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 28, 2019 23:50 IST

कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची नागपूर फ्लाईंग क्लबच्या चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी दोन आठवड्यात नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. तसेच, जयस्वाल यांना त्यांच्या मागणीनुसार पाच लाख रुपये मासिक वेतन देण्यात यावे असेही सांगितले.

ठळक मुद्देहायकोर्टाचा आदेश : मासिक वेतन पाच लाख रुपये

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कॅप्टन शिवकुमार जयस्वाल यांची नागपूर फ्लाईंग क्लबच्या चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदी दोन आठवड्यात नियुक्ती करण्यात यावी, असा आदेश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने शुक्रवारी राज्य सरकारला दिला. तसेच, जयस्वाल यांना त्यांच्या मागणीनुसार पाच लाख रुपये मासिक वेतन देण्यात यावे असेही सांगितले.प्रकरणावर न्यायमूर्तीद्वय सुनील शुक्रे व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. चिफ फ्लाईंग इन्स्ट्रक्टरपदासाठी २७ सप्टेंबर २०१८ रोजी मुंबई येथे उमेदवारांच्या मुलाखती घेण्यात आल्या होत्या. मुलाखत समितीमध्ये नागरी उड्डयन विभागाचे प्रधान सचिव, वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव, नागरी उड्डयन संचालक व इतरांचा समावेश होता. या समितीने सारासार विचार करून कॅप्टन जयस्वाल यांची निवड केली होती. तसेच, जयस्वाल यांनी मागितलेल्या वेतनावर चर्चा करून अंतिम निर्णय घेण्यात यावा, असे क्लबचे अध्यक्ष असलेल्या विभागीय आयुक्तांना सांगितले होते. त्यानंतर विभागीय आयुक्तांनी हा मुद्दा योग्य पद्धतीने हाताळला नाही व हे पद भरण्यासाठी ४ जून रोजी नवीन जाहिरात प्रसिद्ध करून पात्र व्यक्तींकडून अर्ज मागवले. न्यायालयाने विविध बाबी लक्षात घेता ही कृती अयोग्य ठरवून जयस्वाल यांच्या नियुक्तीचा आदेश दिला.यासंदर्भात सुमेधा घटाटे यांची जनहित याचिका न्यायालयात प्रलंबित आहे. त्यांनी जयस्वाल यांच्या नियुक्तीची मागणी केली होती. विदर्भाची शान असलेल्या नागपूर फ्लाईंग क्लबच्या भल्याकरिता राज्य सरकार आवश्यक निर्णय घेत आहे. परंतु, व्यवस्थापनातील असक्षम अधिकाऱ्यांमुळे क्लबची प्रगती थांबली आहे. व्यवस्थापनामध्ये सक्षम अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या तेव्हा नागपूर फ्लाईंग क्लबने उंच भरारी घेतल्याचा इतिहास आहे. सध्या मात्र क्लबची अवस्था फारशी चांगली नाही असे याचिकाकर्तीचे म्हणणे आहे. याचिकाकर्तीतर्फे अ‍ॅड. श्रीनिवास देशपांडे यांनी कामकाज पाहिले.क्लबच्या विकासाकरिता काय करतायक्लबच्या सर्वांगीण विकासाकरिता काय उपाययोजना करण्यात येणार आहेत अशी विचारणा उच्च न्यायालयाने विभागीय आयुक्तांना केली. तसेच, यावर १९ जुलैपर्यंत प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले. जयस्वाल यांनाही क्लबच्या सुधारणेकरिता आवश्यक सूचना करता येतील असे आदेशात स्पष्ट करण्यात आले.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयOrder orderआदेश केणे