मनपा निवडणुकीसाठी समिती नेमा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2021 04:18 IST2021-09-02T04:18:25+5:302021-09-02T04:18:25+5:30

नासुप्रच्या नियुक्तीवरून जैस्वाल-चतुर्वेदीत खटके - नासुप्रवर जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची नियुक्ती झाली. ग्रामीणच्या व्यक्तीची शहरात नियुक्ती केली, यावर चतुर्वेदी ...

Appoint a committee for municipal elections | मनपा निवडणुकीसाठी समिती नेमा

मनपा निवडणुकीसाठी समिती नेमा

नासुप्रच्या नियुक्तीवरून जैस्वाल-चतुर्वेदीत खटके

- नासुप्रवर जिल्हाप्रमुख संदीप इटकेलवार यांची नियुक्ती झाली. ग्रामीणच्या व्यक्तीची शहरात नियुक्ती केली, यावर चतुर्वेदी यांनी नाराजी व्यक्त केली. मुद्दा पक्षप्रमुखांकडे मांडण्यासाठी जैस्वाल हे आपल्यासोबत येणार होते, असे चतुर्वेदी यांनी सांगितले. यावर जैस्वाल आक्रमक होत आपण असे बोललोच नाही, असे सांगितले. शिवसेनेत एकदा नियुक्ती झाली की कुणालाही हटविता येत नाही, असेही जैस्वाल म्हणाले. या मुद्यावर जैस्वाल-चतुर्वेदी यांच्यात खटके उडाले. यावेळी देसाई यांनी मध्यस्थी करीत नियुक्त केलेल्या व्यक्तीचा वापर पक्षासाठी करून घेण्याची सूचना केली.

गजानन कीर्तीकर अनुपस्थित

- शिवसेनेतर्फे पूर्व विदर्भ संपर्क प्रमुख म्हणून खा. गजानन कीर्तीकर यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. पूर्वी कोणताही निर्णय घेताना संपर्क प्रमुखाची भूमिका महत्त्वाची असायची. मात्र, या बैठकीत कीर्तीकर हे अनुपस्थित होते. यावर आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

Web Title: Appoint a committee for municipal elections