शनिवारी-रविवारी ‘लाडकी बहीण योजनेचे अर्ज स्वीकारणार
By आनंद डेकाटे | Updated: July 12, 2024 18:36 IST2024-07-12T18:34:24+5:302024-07-12T18:36:28+5:30
Nagpur : सुटीच्या दिवशी शासकीय कार्यालये राहणार सुरू

Applications for 'Ladki Bahin Yojana' will be accepted on Saturday-Sunday also
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : राज्यात मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली आहे. या योजनेची अंमलबजावणी करण्याची जबाबदारी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावर असल्याने या योजनेचे कामकाज विहित कालमर्यादेत पूर्ण करण्यासाठी जिल्हा, उपविभाग व तालुका स्तरावरील कार्यालये शासकीय सुट्टीच्या दिवशी १३ आणि १४ जुलै रोजी सुरु ठेवण्याबाबत परिपत्रक निर्गमित करण्यात आलेले आहे.
शनिवार १३ व रविवार १४ जुलै रोजी शासकीय कार्यालये सुरु ठेवण्यात येत असल्यामुळे महिला लाभार्थी यांना या दोन शासकीय सुट्टीच्या दिवशीही संबंधित मदत केंद्रावर अर्ज दाखल करता येतील. योजनेच्या सर्व महिला लाभार्थींनी अर्ज सादर करण्याचे आवाहन प्रभारी जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे यांनी केले आहे.