व्याज परतावा प्रणालीचा लाभ घेण्याचे आवाहन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 9, 2021 04:10 IST2021-02-09T04:10:23+5:302021-02-09T04:10:23+5:30
नागपूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार उमेदवारांना व्याजाचा परतावा योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी इच्छुकांनी ...

व्याज परतावा प्रणालीचा लाभ घेण्याचे आवाहन
नागपूर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार उमेदवारांना व्याजाचा परतावा योजनेअंतर्गत अर्थसाहाय्य देण्यात येते. या योजनेसाठी इच्छुकांनी डब्ल्यूडब्ल्यूडब्ल्यू.उद्योग.महास्वयम.जीओव्ही.इन या संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व रोजगार उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहाय्यक आयुक्त प्र. गं. हरडे यांनी केले आहे.महामंडळाची ही योजना ज्या प्रवगार्साठी स्वतंत्र महामंडळ अस्तित्वात नाही त्या प्रवर्गांसाठीच आहे. ऑनलाईन माहिती भरताना पात्रता प्रमाणपत्रासाठी आवश्यक असणारी कागदपत्रे आधार कार्ड (अपडेटेड मोबाईल क्रमांक व स्वत:च्या ई-मेल आयडीसह), रहिवासी पुरावा (रहिवासी दाखला, लाईट बिल, रेशनकार्ड, गॅस बिल किंवा बँक पास बुक यापैकी कोणताही एक पुरावा), उत्पन्नाचा पुरावा (उत्पन्नाचा दाखला, आयटी रिटर्न, जर लग्न झाले असल्यास पती-पत्नीचे व लग्न झाले नसल्यास स्वत:चे आयटी रिटर्न अनिवार्य), जातीचा दाखला किंवा शाळा सोडल्याचा दाखला, एकपानी प्रकल्प अहवाल ही कागदपत्रे अनिवार्य आहेत. लाभार्थ्यांनी आॅनलाईन माहिती भरल्यानंतर उमेदवाराला व्याज परतावा प्रमाणपत्र प्राप्त होईल. त्यानंतर कर्ज प्रकरणासोबत प्रमाणपत्र बँकेला स्वत: जाऊन सादर करावे व त्याची पोच घ्यावी. बँक मंजुरीनंतर उमेदवाराने स्वत: वेब प्रणालीत माहिती अद्ययावत केली आहे का, याची खात्री करावी, असे सांगण्यात आले आहे.