शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

‘आपली बस’ची दुचाकीला धडक : आईसह मुलाचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2019 23:49 IST

वेगात असलेल्या आपली बस(स्टार)ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हाला जोरादर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अ‍ॅक्टिव्हावरील आई व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील फेटरी शिवारात असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देफेटरी शिवारातील घटना

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर (कळमेश्वर) : वेगात असलेल्या आपली बस(स्टार)ने विरुद्ध दिशेने येणाऱ्या अ‍ॅक्टिव्हाला जोरादर धडक दिली. त्यात गंभीर जखमी झालेल्या अ‍ॅक्टिव्हावरील आई व मुलाचा मृत्यू झाला. ही घटना कळमेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कळमेश्वर - नागपूर मार्गावरील फेटरी शिवारात असलेल्या हनुमान मंदिराजवळ मंगळवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली.सरस्वती गजभिये (५०) व पंकज गजभिये (३०) दोघेही रा. नागपूर अशी मृतांची नावे आहेत. पंकज हा त्याच्या आईसोबत एमएच-४९/आर-१७६४ क्रमांकाच्या अ‍ॅक्टिव्हाने नागपूरहून कळमेश्वरच्या दिशेने येत होता. शिवाय, काही प्रवासी घेऊन एमएच-३१/सीए-६१६० क्रमांकाची आपली बस कळमेश्वरहून बर्डी (नागपूर)ला जात होती. दरम्यान, फेटरी शिवारातील हनुमान मंदिराजवळ आपली बसने पंकजच्या अ‍ॅक्टिव्हाला जोरदार धडक दिली.त्यात पंकज आणि त्याची आई गंभीर जखमी झाली. अपघाताची माहिती मिळताच पंकजचा मित्र योगेश शिंदे हा लगेच घटनास्थळी पोहोचला. त्याने दोघांनाही लगेच नागपूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये हलविले. तिथे डॉक्टरांनी तपासणीअंती दोघांनाही मृत घोषित केले. दुसरीकडे, कळमेश्वर पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला. शिवाय, अपघातग्रस्त आपली बस व अ‍ॅक्टिव्हा ताब्यात घेतली. या प्रकरणी कळमेश्वर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात सहायक पोलीस निरीक्षक सोनोने करीत आहेत.

टॅग्स :AccidentअपघातDeathमृत्यू