गावागावात चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 04:18 IST2021-01-13T04:18:27+5:302021-01-13T04:18:27+5:30
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावागावातील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या ...

गावागावात चिंता, तरीही कागदावरचा दुष्काळ फक्त २८ गावात
नागपूर : जिल्ह्यातील सर्वच तालुक्यांना ओल्या दुष्काळाचा आणि पुराचा फटका बसला आहे. गावागावातील शेती यामुळे खंगली आहे. पाहणीसाठी आलेल्या केंद्रीय चमूपुढेही हे वास्तव प्रगटले होते. असे असतानाही शासनाच्या यंत्रणेने १,७८९ गावांपैकी फक्त २८ गावातच ५० पैशाच्या आत आणेवारी काढली. त्यामुळे एकाही तालुक्यात दुष्काळ जाहीर होण्याचे लक्षण दिसत नाही. नापिकीची सध्या गावागावात चिंता आहे. शेतकरी मदतीसाठी मोठ्या अपेक्षेने सरकारकडे पाहत आहे, तरीही आकड्यांचा खेळ करून यंत्रणेने शेतकऱ्यांची दिशाभूल केली आहे. नागपूर जिल्ह्यात १,९५३ गावे आहेत. त्यातील खरीपाच्या १,८४४ गावांपैकी १,७८९ गावातील आणेवारी सरकारने काढली. १४ तालुक्यांपैकी १३ तालुक्यात एकाही गावात आणेवारी ५० पैशाच्या आत नाही. फक्त मौदा आणि नागपूर (ग्रामीण) या दोन तालुक्यातील २८ गावातच आणेवारी ५० पैशाच्या आत दाखविली आहे. जिल्ह्यात पीक परिस्थिती वाईट आहे. सोयाबीन, धान आणि कापूस ही मुख्य पिके सर्वच ठिकाणी वाया गेली आहेत. सोयाबीनचा पेरा नरखेड, काटोल, सावनेर, कळमेश्वर, हिंगणा, नागपूर (ग्रामीण), भिवापूर, कामठी या तालुक्यात होता. मात्र, पावसाने सर्व पीक वाया गेले. रामटेक, मौदा, कुही, भिवापूर, कामठी, पारशिवनी या तालुक्यात धानाला मोठा फटका बसला आहे. तर नरखेड, काटोल, कळमेश्वर, सावनेर, हिंगणा, उमरेड, भिवापूर, कुही, कामठी, पारशिवनी, नागपूर (ग्रामीण) या कापूस उत्पादक तालुक्यातही मोठे नुकसान झाले आहे. ... अशीही फसगत
यंत्रणेने जिल्ह्यातील १,७८९ गावाची पैसेवारी जाहीर केली. त्यात नागपूर (ग्रामीण) तालुक्यातील १४८ पैकी २५ गावात आणि मौदा येथील १०४ पैकी फक्त ३ गावातच ५० पैशाच्या आत आणेवारी दाखविली. त्यामुळे या दोन्ही तालुक्यात दुष्काळ जाहीर केला जाणे जवळपास शक्यच नाही. एकीकडे गावे दुष्काळात दाखवायची, मात्र मदत कशी मिळणार नाही, याचीही दक्षता घ्यायची, असा फसवणुकीचा आणि डोळ्यात धूळ झोकणारा प्रकार यंत्रणेकडून घडला आहे.
...
तालुकानिहाय पैसेवारी तालुका - ५० पैशाच्या आत - ५० पैशाच्या वर
नागपूर शहर - ० -०
नागपूर ग्रामीण - २५ -१२३
कामठी - ० - ७५ हिंगणा - ० - १४० काटोल - ० - १८५ नरखेड - ० - १५५ सावनेर - ० - १३५ कळमेश्वर - ० - १०७ रामटेक - ० - १५२ पारशिवनी - ० - ११४ मौदा - ३ - १०४ उमरेड - ० - १८५ भिवापूर - ० - १२१ कुही - ० - १६२
...