शहरं
Join us  
Trending Stories
1
समुद्रात पेरल्या जाताहेत मृत्यूच्या खाणी! ट्रम्प यांच्या 'प्लॅन २' मुळे इराणची झोप उडाली; जगाचं टेन्शन वाढलं
2
मोठी बातमी! RBI कडून पेटीएमचा बँकिंग परवाना कायमचा रद्द; युजर्सवर काय परिणाम होणार...
3
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना कर्करोग! स्वतःच केला धक्कादायक खुलासा; आता कशी आहे तब्येत?
4
पुण्यात भरवर्दळीत सलूनमध्ये घुसून गोळीबार; दोघे जखमी
5
चार मुले जन्माला घाला, त्यातील एक संघाला द्या; बागेश्वर धामचे धीरेंद्र कृष्ण शास्त्री यांच्या विधानावरून नव्या वादाची चिन्हं
6
Travel : चक्क लाटा बाजूला सारून दर्या दुभंगतो; समुद्राच्या पोटातून रस्ता जातो! कुठे आहे ही जागा?
7
आप फुटली, भाजपाची ताकद वाढली! राज्यसभेत आता कोणत्या पक्षाचे किती खासदार?
8
Travel : आयआरसीटीसीची पुरी, कामाख्या बैद्यनाथ तसेच दिव्य दक्षिण यात्रा; पुणे आणि नागपुरातून प्रारंभ 
9
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
10
नेपाळमध्ये भारतीय भाविकांच्या बसला अपघात; २१ जण जखमी, ६ वर्षांच्या चिमुरडीसह एका महिलेचा मृत्यू
11
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
12
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
13
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
14
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
15
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
16
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
17
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
18
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
19
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
20
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
Daily Top 2Weekly Top 5

श्वानांना देणार अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन

By admin | Updated: February 3, 2015 01:02 IST

मिशन रॅबिजअंतर्गत वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस व डॉग ट्रस्टच्या सहकार्याने शहरात पाच हजार मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांना सोमवारपासून अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देणे सुरू करण्यात आले आहे.

रॅबिजमुक्त परिसर अभियानाला सुरुवातनागपूर : मिशन रॅबिजअंतर्गत वर्ल्डवाईड व्हेटरनरी सर्व्हिसेस व डॉग ट्रस्टच्या सहकार्याने शहरात पाच हजार मोकाट जनावरे व पाळीव कुत्र्यांना सोमवारपासून अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देणे सुरू करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारीपर्यंत चालणाऱ्या या मोहिमेत नागपूरच्या वेट्स फॉर अ‍ॅनिमल व इंडियन सोसायटी फॉर अ‍ॅनिमल ह्युमन वेल्फेअर यांचे सहकार्य मिळाले आहे. महानगरपालिकेच्या हनुमाननगर झोनमधून या मोहिमेला सुरुवात झाली. यावेळी सत्तापक्ष नेता दयाशंकर तिवारी, आरोग्य समितीचे सभापती रमेश सिंगारे, हनुमाननगर झोनच्या सभापती सारिका नांदूरकर, नगरसेवक योगेश तिवारी, डॉ. एंडी उपस्थित होते. विशेष म्हणजे, सप्टेंबर २०१३ मध्ये १५ दिवसांसाठी ही मोहीम राबविण्यात आली होती. या दरम्यान पाच हजार श्वानांना अ‍ॅण्टीरॅबिज व्हॅक्सिन देण्यात आले होते. यावर्षीही रेड, ब्ल्यू, ग्रीन आणि आॅरेंज नावाची टीम तयार करण्यात आली आहे. प्रत्येक टीममध्ये कुत्री पकडणारे चार कर्मचारी, एक डॉक्टर, एक परिचारिका, एक अटेंडंट, वाहनचालकासह एकूण आठ जणांचा समावेश असणार आहे. मनपाचे आरोग्य अधिकारी डॉ. अशोक उरकुडे, पशुचिकित्सक डॉ. गजेंद्र महल्ले, पशुसंवर्धन विभागाचे डॉ. उमेश हिरुळकर, वेट्स फॉर अ‍ॅनिमल संस्थेचे अध्यक्ष डॉ. श्रीधर बुधे, डॉ. शशिकांत जाधव, प्रमोद कानेटकर, हनुमाननगर झोनचे झोन अधिकारी कलोडे आदी उपस्थित होते. ३ फेब्रुवारीला मेडिकल कॉलेज परिसर, राजाबाक्षा, वंजारीनगर, क्रीडा चौक, अशोक चौक परिसरातील कुत्र्यांना व्हॅक्सिनेशन करण्यात येणार आहे.(प्रतिनिधी)