शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

नागरिकांना आणखी एक शॉक, एक रुपयापर्यंत वीज महाग

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2025 11:17 IST

Nagpur : फेब्रुवारीत २.७० ग्राहकांकडून वसूल करणार ५२७.७३ कोटी

कमल शर्मालोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : आधीच वीज दराने त्रस्त महाराष्ट्रातील लोकांना पुन्हा शॉक दिला आहे. महाराष्ट्र प्रदेश वीज नियामक आयोगाने महावितरणला त्यांच्या सुमारे २ कोटी ७० लाख ग्राहकांकडून ५२७ कोटी ७३ लाख रुपये इंधन समायोजन शुल्क वसूल करण्यास परवानगी दिली आहे. याचा फटका प्रत्येक श्रेणीतील ग्राहकांना बसणार आहे. घरगुती वीज ग्राहकांना तर प्रति युनिट एक रुपयापर्यंत अधिक पैसे द्यावे लागतील.

हवामान बदलामुळे नोव्हेंबर २०२४ मध्ये उकाडा होता. यामुळे विजेच्या मागणीत लक्षणीय वाढ झाली. नियामक आयोगाने या वाढीचा अंदाज लक्षात घेता २२.२३ कोटींची अतिरिक्त वीज खरेदी करण्यास परवानगी दिली होती; परंतु लोडशेडिंग टाळण्यासाठी एकूण ५२७.७३ कोटी रुपयांची अतिरिक्त वीज खरेदी करावी लागली. 

महावितरणने १७ डिसेंबर, ३ जानेवारी, ८ जानेवारी आणि १४ जानेवारी रोजी याचिका दाखल करून ग्राहकांवर एफएसी लावण्यासाठी आयोगाकडे परवानगी मागितली होती. आयोगाने ही मागणी मंजूर केली. त्यांच्या आदेशाने म्हटले आहे की नोव्हेंबर २४ मध्ये २ हजार दशलक्ष युनिट्स (एमयू) खरेदी अधिक झाली. त्यावर अतिरिक्त खर्च झाला. आता फेब्रुवारीच्या बिलात एफएसी लावून ग्राहकांकडून वसुली करणार आहे. याचा थेट परिणाम फेब्रुवारी आणि मार्चच्या वीज बिलांवर होईल. दुसरीकडे, १ एप्रिलपासून राज्यात नवीन वीज दर लागू होणार आहे. या पार्श्वभूमीवर सुनावणीला सुरुवात झाली आहे. तथापि, यापूर्वी महावितारानने ग्राहकांना जबर धक्का दिला आहे. 

अल्प मुदत खरेदीचा परिणाममहाविरणचा असा अंदाज आहे की, नोव्हेंबरमध्ये ग्राहकांना अखंडित वीजपुरवठा करण्यासाठी इतर स्रोतांकडून वीज खरेदी करावी लागली. आयोगाची परवानगी नसताना ३.३५ रुपये प्रति युनिट दराने ७९३.०७ एमयू वीज खरेदी अल्प कालावधीत करावी लागली. त्याचप्रमाणे, खाजगी उत्पादकांकडून ३१९९.८१ एमयू, वीज घ्यावी लागली. परिणामी, अधिक वीज खरेदी करावी लागली.

किती पैसे द्यावे लागतील.श्रेणी                         इंधन समायोजन शुल्क (प्रति युनिट)घरगुती ग्राहकबीपीएल                            १५ पैसे० ते १०० युनिटस               ४० पैसे१०१ ते ३०० युनिट्स           ७० पैसे३०१ ते ५०० युनिटस          ९० पैसे५०० युनिट्सहून अधिक     एक रुपयाएच.टी. औद्योगिक            ५५ ते ७० पैसेव्यावसायिक                     ६५ ते ९० पैसेईव्ही चार्जिंग                     ६५ पैसेहॉस्पिटल / शैक्षणिक        ५० ते ६५ पैसे

टॅग्स :electricityवीजnagpurनागपूर