Another positive in Nagpur; Total Score | Corona Virus in Nagpur; नागपुरात अजून एकजण पॉझिटिव्ह; एकूण आकडा १०

Corona Virus in Nagpur; नागपुरात अजून एकजण पॉझिटिव्ह; एकूण आकडा १०


लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: शनिवारी सकाळी उपराजधानीत अजून एका व्यक्तीचा कोरोना चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. आता नागपुरातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १० झाली आहे. कोरोनाची लागण झालेला हा रुग्ण ४० वर्षांचा पुरुष आहे.
शहरात संचारबंदी व जमावबंदी लागू असून नागरिकांमध्येही कोरोनाबाबत आता पुरेशा गंभीरतेने जाण आल्याचे दिसते आहे. आधी कोरोनाबाबत बेफिकीर असलेला युवा वर्ग आता चेहऱ्याला मास्क लावून व दोन व्यक्तींमध्ये योग्य ते अंतर राखून वागताना दिसतो आहे.
विदर्भातील एकूण संख्या १५ असून तीत गोंदिया १, यवतमाळ ४ असे रुग्ण आहेत.
कोरोनापासून संरक्षण मिळावे म्हणून शासनपातळीवर शर्थीचे प्रयत्न होत आहेत. नागरिकांच्या मनातही कोरोनाबाबत पुरेशी जागरुकता व धास्ती आली आहे. तथापि, कोरोनाग्रस्तांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होताना दिसते आहे. तर दुसरीकडे नागपुरातील पहिला कोरोनाग्रस्त रुग्ण हा बरा होऊन घरी परतला असल्याचेही आशादायक चित्र आहे.

Web Title: Another positive in Nagpur; Total Score

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.