लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली. अक्षय मेश्राम (वय २२) असे आरोपीचे नाव आहे.पीडित मुलगी (वय १५) प्रतापनगरात राहते. नेहमीप्रमाणे ती रविवारी सायंकाळी गार्डनमध्ये खेळायला गेली होती. खेळणे झाल्यानंतर ती रात्री ७.३० च्या सुमारास आपल्या घराकडे निघाली. वाटेत आरोपी अक्षय मेश्रामचे घर आहे. तो ओळखीचा असल्याने तिने त्याला पिण्यासाठी पाणी मागितले. आरोपीने पाणी देण्याच्या बहाण्याने तिला घरात बोलविले आणि तिच्यावर बलात्कार केला. याबाबत कुणाला काही सांगितल्यास ठार मारेन, अशी धमकी दिली. मुलीने घरी परतल्यानंतर पालकांना हा प्रकार सांगितला. त्यानंतर प्रतापनगर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, आरोपी मेश्रामची चौकशी सुरू आहे.नागपुरातील बलात्काराची तीन दिवसातील लागोपाठ ही तिसरी घटना होय. त्यामुळे सर्वत्र भीतीचे वातावरण पसरले आहे. बालाघाट येथील मुलीवर यशोदरानगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडलेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेनंतर एमआयडीसी भागात सामूहिक बलात्काराची दुसरी घटना घडली. आता राणाप्रतापनगर भागात घडलेली ही तिसरी घटना होय.
नागपुरात आणखी एका मुलीवर बलात्कार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2018 19:50 IST
ओळखीच्या तरुणाने एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची घटना प्रतापनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत रविवारी रात्री घडली.
नागपुरात आणखी एका मुलीवर बलात्कार
ठळक मुद्देतीन दिवसातील लागोपाठ तिसरी घटना