शहरं
Join us  
Trending Stories
1
नरेंद्र मोदींचा उत्तराधिकारी कोण बनणार? सरसंघचालक मोहन भागवतांचं सूचक विधान, म्हणाले...    
2
३१ डिसेंबर आहे अखेरची तारीख, 'ही' २ कामं पटापट आटोपून घ्या; केली नाही तर समस्यांना सामोरं जावं लागेल
3
धक्कादायक! SMAT स्पर्धेसाठी निवड न झाल्याच्या रागातून कोचवर जीवघेणा हल्ला; तीन क्रिकेटपटूंवर आरोप
4
शिंदेंचा ‘वाघ’ थेट बिबट्याच्या वेशात विधान भवनात; हात जोडून सरकारला विनवणी, “गेली २० वर्षे...”
5
ममता बॅनर्जींनी केंद्र सरकारच्या आदेशाचा कागद फाडला! कशावरून रंगला 'हाय-व्होल्टेज' ड्रामा?
6
पाकिस्तानात शूट झालाय रणवीर सिंगचा 'धुरंधर'? अभिनेत्याचा मोठा खुलासा, म्हणाला- "तिथले गँगस्टर..."
7
माणुसकी संपली! हेल्थ चेकअपमध्ये कॅन्सर झाल्याचे कळले; IT कंपनीने २१ वर्षांचा अनुभव असलेल्या कर्मचाऱ्याला काढले 
8
'वीर सावरकर पुरस्कार' नाकारला! काँग्रेस खासदार शशी थरूर यांनी HRDS इंडियाचा प्रस्ताव फेटाळला; 'सहमतीशिवाय घोषणा केल्याने' वाद
9
Viral Video: अरे, हे चाललंय तरी काय? जोडप्यानं हायवेवर कार बाजूला लावली अन् रस्त्यावरच...
10
२०२६ मधील सार्वजनिक सुट्ट्यांची यादी जाहीर, भाऊबीजेला अतिरिक्त सुट्टी; सरकारकडून अधिसूचना जारी
11
कोण सरस...? टाटा नेक्सॉन आणि मारुती विक्टोरिसची समोरासमोर टक्कर झाली; दोन्ही ५ स्टार, कोणाची काय हालत...
12
रुपया गडगडल्यामुळे देशात महागाई वाढणार? आयातदारांची चिंता वाढली, RBI आता काय करणार?
13
Silver Price Today: चांदीचा दर विक्रमी उच्चांकावर, किंमत १.९० लाख रुपयांच्या पुढे; आता गुंतवणूक करणं योग्य होईल का?
14
Nana Patole: निवडणूक आयोगाच्या कारभारावर आक्षेप; आयुक्तांना पदावरून हटवण्याची पटोलेंची मागणी
15
याला म्हणतात नशीब! गरिबीशी लढणाऱ्या २ मित्रांचं आयुष्यच बदललं; सापडला ५० लाखांचा हिरा
16
धक्कादायक! लग्नासाठी जमीन विकली; २ वेळा बनला नवरदेव, पण दोन्ही वेळा फसला, चुना लावून वधू पसार
17
टेस्लाला मोठा झटका, VinFast बनली EV मार्केटची 'महाराणी'! आता असा आहे इलॉन मस्क यांच्या फ्यूचर प्लॅन
18
मालवणीतील वादाप्रकरणी मंत्री मंगलप्रभात लोढा आणि आमदार अस्लम शेख यांच्यात शाब्दिक चकमक
19
VIDEO: लग्नमंडपात काकूंचीच हवाsss... नवरा-नवरी वरमाला घालत असताना हवेत ५ राऊंड्स गोळीबार
Daily Top 2Weekly Top 5

नागपूरचा डॉन आंबेकरविरुद्ध आणखी एक गुन्हा दाखल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 18, 2019 23:54 IST

कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने गुजरातच्या आणखी एका व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे.

ठळक मुद्देविमानतळ परिसरात जमिनीचा सौदावापीच्या व्यावसायिकाचे एक कोटी हडपलेपिस्तूल दाखवून जीवे मारण्याची धमकी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कुख्यात गुंड संतोष शशिकांत आंबेकर आणि त्याच्या साथीदाराने गुजरातच्या आणखी एका व्यावसायिकाला एक कोटींचा गंडा घातल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. ही रक्कम परत मागितली असता पिस्तुलाचा धाक दाखवून जीवे मारण्याची धमकीही दिल्याने आंबेकर आणि त्याच्या साथीदारांविरुद्ध सोनेगाव पोलीस ठाण्यातही गुन्हा दाखल झाला आहे.हेमंत मोहनजी पुरोहित (वय ३१) असे फसवण्यात आलेल्या व्यावसायिकाचे नाव असून, ते गुजरातच्या वापी येथील देसाई वॉर्डात राहतात. पुरोहित कॉस्मो प्लास्टिक वेस्टचा व्यवसाय करतात. ते प्रॉपर्टी डीलिंगही करतात. त्यांना महाराष्ट्रात कोणत्याही मोठ्या शहरात गोदामासाठी जागा हवी होती. त्यासाठी ते शोधाशोध करीत होते. आंबेकरचा साथीदार रमेश ऊर्फ राम पाटील याने पुरोहित यांना जागा मिळवून देण्याचे आश्वासन दिले. यानिमित्ताने पाटीलने पुरोहित यांची कुख्यात आंबेकरसोबत ओळख करून दिली. जमिनीच्या व्यवहाराची बातचीत झाल्यानंतर आंबेकरने पुरोहितांना बालाजी फर्ममध्ये २५ लाख रुपये जमा करण्यास सांगितले. त्यानुसार पुरोहित ही रोकड बालाजी फर्ममध्ये जमा करण्यास तयार झाले.नोटा बदलविण्याची ऑफरत्याचवेळी आरोपी पाटीलने पुरोहित यांना तुम्हाला नोटा बदलवायच्या आहेत का, असा प्रश्न केला. तुम्ही २ हजारांच्या नोटा (१ कोटी) जमा केल्यास तुम्हाला १ लाख रुपये आणि ५०० च्या एक कोटी रुपये जमा कराल तर तुम्हाला १ लाख रुपये कमिशन मिळेल, असे सांगितले. हा सर्व व्यवहार हवालाने करण्यास सांगितले. पुरोहित यांनी एक लाख रुपयांच्या कमिशनच्या आमिषापोटी २० ऑगस्ट २००८ ला पुरोहित यांनी वापी (गुजरात) येथून बालाजी फर्ममध्ये एक कोटी रुपये जमा केले. त्यावेळी त्यांना १० रुपयाची एक नोट (नंबर ४४ एम ८०९६८१) फाडून त्याचा अर्धा भाग देण्यात आला.नोट घेतली, धमकी दिलीएक कोटी रुपये घेतल्यानंतर ही अर्धी (फाटलेली दहाची) नोट दाखविल्यानंतर कमिशन व भरलेले एक कोटी रुपये मिळतील, अशीही बतावणी करण्यात आली. नागपूरला तुम्हाला भाऊ मिळतील, ते ही रक्कम देतील, असेही सांगण्यात आले. त्यानुसार, आपली रोकड घेण्यासाठी पुरोहित नागपूरला आले. त्यांना विमानतळ परिसरात कुख्यात आंबेकर, रमेश पाटील (नाशिक, मुंबई) आणि सन्नी ऊर्फ विकास राजकुमार वर्मा (वय २९, रा. नटराज टॉकीजजवळ, नागपूर) हे तिघे भेटले. त्यांच्याकडून दहाची अर्धी नोट घेतल्यानंतर तुमची रक्कम तुम्हाला लकवरच मिळेल, असे सांगून त्यांना परत पाठविण्यात आले. त्यानंतर रमेशने पुरोहित यांना फोन करून नागपूरची जमीन आणि एक कोटी रुपये विसरून जा. तुम्ही ब्लॅकमनी बाळगता, हवालाने व्यवहार करता, याची माहिती उघड केली तर तुमच्या अडचणी वाढतील, असे सांगून कारवाईचा धाक दाखविण्यात आला. पुरोहितांनी विरोध केला असता जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली.आंबेकरवर गुन्हे शाखेत उपचारहवालाचा व्यवहार आणि जीवे मारण्याची धमकी या दोन्हीमुळे पुरोहित हादरले अन् गप्प बसले. त्यामुळे आंबेकर टोळी बिनधास्त होती. मात्र, जिगर पटेल यांचे प्रकरण उघड झाल्यानंतर पोलिसांनी आंबेकरला त्याच्या भाच्यासह अटक केल्याने या टोळीच्या तावडीत सापडलेल्यांना मानसिक बळ मिळाले. त्यामुळे पुरोहित यांनी नागपूर पोलिसांशी संपर्क करून आपली कैफियत ऐकवली. पोलिसांनी त्यांचीही तक्रार नोंदवून घेतली. जिगर पटेल प्रकरणात पोलिसांच्या कस्टडीला चुकविण्यासाठी मेडिकलमध्ये पोहचलेल्या आंबेकरला गुन्हे शाखेने आज पुन्हा ताब्यात घेतले. त्याला आणि नीलेश केदारला कोर्टात हजर करून त्यांचा २३ ऑक्टोबरपर्यंत पीसीआर मिळविण्यात आला. दुसरीकडे सोनेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी दाखल झालेल्या दुसऱ्या गुन्ह्यात आंबेकरचा ‘भांजा’ सन्नी वर्मा याला पोलीस निरीक्षक अनिल ताकसांडे यांनी अटक केली. गुन्ह्याची उकल करण्यासाठी या तीनही मामा-भाच्यावर पोलीस वेगवेगळ्या पद्धतीचे उपचार करीत आहेत. दरम्यान, अशा प्रकारचे आणखी अनेक गुन्हे लवकरच उघड होण्याची शक्यता सूत्रांनी वर्तविली आहे.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर