नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 10:58 IST2019-05-18T10:55:01+5:302019-05-18T10:58:59+5:30

बेला येथील अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला.

Anjali Kotmambak of Nagpur, second in the Miss India competition | नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय

नागपूरची अंजली कोटंबकर मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय

लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : बेला येथील अंजली कोटंबकरने देहरादून येथे झालेल्या मिस इंडिया स्पर्धेत द्वितीय पुरस्कार पटकावला. तिच्या कामगिरीमुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला. ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय फॅशन डिझायनर सुफी शाबरी यांनी आयोजित केली होती. स्पर्धेत दिल्ली, मुंबई, नागपूर, हैदराबाद इत्यादी शहरातील मुली सहभागी झाल्या होत्या. स्पर्धकांचे सहा फेऱ्यांमध्ये परीक्षण करण्यात आले. अंजलीने कुटुंबीय व वन डायरेक्शन ग्रुपचे इमाम शेख यांना यशाचे श्रेय दिले.

Web Title: Anjali Kotmambak of Nagpur, second in the Miss India competition

टॅग्स :fashionफॅशन