नागपूर नजीक कामठीच्या मंदिरात रोखला पशुबळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2020 11:01 PM2020-10-28T23:01:00+5:302020-10-28T23:03:29+5:30

Animal Sacrifice stopped by police. crime newsसमाजात शिक्षणाचे प्रमाण कितीही वाढत असले तरी काहींनी पशुबळीची परंपरा जाेपासली आहे. कामठी (जिल्हा नागपूर) शहरातील देवीच्या मंदिरात दाेन बाेकडांचा बळी दिला जात असल्याची माहिती करिष्मा गिलानी यांनी माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना मोबाईलवर देत पाेलिसात तक्रार नाेंदविली.

Animal sacrifice stopped at the temple of Kamathi near Nagpur | नागपूर नजीक कामठीच्या मंदिरात रोखला पशुबळी

नागपूर नजीक कामठीच्या मंदिरात रोखला पशुबळी

Next
ठळक मुद्देकरिष्मा गिलानी यांच्या तक्रारीनंतर मनेका गांधी यांचा पाेलीस आयुक्तांना फाेन

लाेकमत न्यूज नेटवर्क

कामठी : समाजात शिक्षणाचे प्रमाण कितीही वाढत असले तरी काहींनी पशुबळीची परंपरा जाेपासली आहे. कामठी (जिल्हा नागपूर) शहरातील देवीच्या मंदिरात दाेन बाेकडांचा बळी दिला जात असल्याची माहिती करिष्मा गिलानी यांनी माजी केंद्रीय मंत्री मनेका गांधी यांना मोबाईलवर देत पाेलिसात तक्रार नाेंदविली. मनेका गांधी यांनी तात्काळ नागपूर शहर पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी फाेनवर संपर्क साधला. पोलिसांनी तात्काळ दखल घेऊन धडक देत पशुबळीचा प्रकार हाणून पाडला. हा प्रकार मंगळवारी दुपारी घडला. या प्रकरणी पाेलिसांनी अद्याप कुणालाही अटक केली नाही.

कामठी शहरातील बजरंग पार्क परिसरातील माॅ दुर्गा सप्तशती मंदिरात दसऱ्याच्या पाडव्याला काही नागरिकांकडून दाेन बाेकडांचा बळी दिला जात असल्याची माहिती शहरातील एका २५ वर्षीय तरुणीला मिळाली हाेती. तिने लगेच या प्रकाराची व्हिडीओ क्लीप तयार करून माजी केंद्रीय पर्यावरण मंत्री मनेका गांधी यांना पाठविली आणि बाबत नागपूर जिल्हा प्राणी संरक्षण समितीच्या पदाधिकारी करिष्मा गिलानी यांना दिली. या क्लीपची तातडीने दखल घेत मनेका गांधी यांनी नागपूर शहर पाेलीस आयुक्त अमितेशकुमार यांच्याशी फाेनवर संपर्क साधून माहिती दिली. पोलीस आयुक्तांचे निर्देश मिळताच कामठी (जुनी) पाेलिसांचे पथक माॅ दुर्गा मंदिरात दाखल झाले. मात्र, ताेपर्यंत नागरिकांनी दाेन्ही बाेकड तिथेच साेडून पळ काढला हाेता. त्यामुळे पाेलिसांनी दाेन्ही बाेकड ताब्यात घेत त्यांना शहरातील गाेरक्षणमध्ये पाठविण्याची व्यवस्था केली. त्या बाेकडांची किंमत सहा हजार रुपये असल्याचेही पाेलिसांनी सांगितले. याप्रकरणी गिलानी यांच्मच्ठीया तक्रारीवरून कामठी (जुनी) पाेलिसांनी अज्ञात आराेपींविरुद्ध भादंवि १८८, २६९, २७०, प्राण्यांचा छळ प्रतिबंधक कायदा १९६०, सहकलम ११ (१), महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा १९९५, सहकलम ५ (क) ९ (अ) अन्वये गुन्हा नाेंदविला आहे. या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक कल्पना कटारे करीत आहेत. वृत्त लिहिस्ताे या प्रकरणात कुणालाही चाैकशीसाठी ताब्यात घेण्यात आले नव्हते किंवा अटक करण्यात आली नव्हती.

एकाचा बळी चढवला

या नागरिकांनी मंदिरात बळी देण्यासाठी तीन बाेकड आणले हाेते. या प्रकाराची माहिती मिळून पाेलिसांनी मंदिर गाठेपर्यंत त्यांनी यातील तपकिरी रंगाच्या एका बाेकडाचा बळी दिला हाेता. मात्र, पाेलीस मंदिरात येत असल्याची कुणकुण लागल्याने त्यांनी उर्वरित दाेन्ही बाेकड तिथेच साेडून पळ काढला, अशी माहिती पाेलीस सूत्रांनी दिली. त्यातच मंदिराचे विश्वस्त व काही नागरिकांनी त्या बाेकडांना पाेलीस ठाण्यात नेले. यावेळी पाेलीस ठाण्याच्या आवारात नागरिकांनी गर्दी केली हाेती. पाेलिसांनी मंदिराची प्रत्यक्ष पाहणी केली असता त्यांना मंदिरातील कालिमातेच्या प्रतिमेला पूजा करून लिंबू अर्पण केल्याचे आढळून आले.

मंदिर कुणाच्या परवानगीने उघडले?

काेराेना संक्रमण राेखण्यासाठी शासनाने मंदिर व इतर धार्मिक स्थळे उघडण्यास परवानगी दिली नाही. असे असताना कामठी शहरातील या सप्तशती माॅ दुर्गा मंदिरात पशुचा बळी देण्याचा प्रकार घडला. त्यामुळे मंदिर नेमके कुणाच्या परवानगीने उघडण्यात आले, हा प्रश्न अनुत्तरीत आहे. ही बाब करिष्मा गिलानी यांनी पाेेलिसांच्या निदर्शनास आणून दिली. त्यामुळे कामठी (जुनी) पाेलिसांनी मंदिर विना परवानगी उघडणे, तिथे फिजिकल डिस्टन्सिंग व इतर उपाययाेजनांचे पालन न करणे यासह अन्य बाबी विचारात घेत मंदिर व्यवस्थापनाविरुद्धही आपत्ती व्यवस्थापन कायदा १८६०, भादंवि १८८, २६९, २७० अन्वये गुन्हा नाेंदविला आहे.

Web Title: Animal sacrifice stopped at the temple of Kamathi near Nagpur

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.