नागपुरात अचानक वाढले जनावरांच्या खाद्याचे दर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 21, 2020 22:02 IST2020-05-21T21:59:28+5:302020-05-21T22:02:39+5:30
लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.

नागपुरात अचानक वाढले जनावरांच्या खाद्याचे दर
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : लॉकडाऊनमुळे दोन महिन्यांपासून बंद असलेली दुकाने आता सुरू व्हायला लागली आहेत. या परिस्थितीचा फायदा घेत दुकानदार अधिक दराने माल विक्री करीत असल्याचे चित्र आहे. जनावरांचे खाद्य पदार्थांचे दर अचानक वाढल्याचे दिसून येत आहे. दुकानातील रेडिमेड खाद्य दरात तर ५०० ते ७०० रुपयांची वाढ झाली असून जनावरे पाळणाऱ्यांच्या खिशाला कात्री लागली आहे.
कोरोनामुळे लॉकडाऊन लागले तेव्हा किराणा, औषधी व भाज्या वगळता सर्व दुकाने बंद करण्यात आली होती. आता त्यात शिथिलता आणत इतरही दुकाने उघडण्यास परवानगी देण्यात आली. बंद असल्याने दुकानातील माल जशाचा तसा असेल पण दुकानदार स्टॉक नसल्याचे कारण देत चढ्या दारात विकत आहेत. जनावरांचे खाद्य विकणाऱ्यांनीही या परिस्थितीचा फायदा घेणे सुरू केले आहे. श्वानांचे शेल्टर होम चालविणाऱ्या स्मिता मिरे यांनी दिलेल्या माहितीनुसार श्वानांच्या रेडिमेड खाद्याची बॅग १५०० ते १६०० रुपयांना मिळायची. ती बॅग आता २२०० ते २५०० रुपयांना विकली जात आहे. म्हणजे जवळपास ७०० रुपयांचा फरक पडला. लॉकडाऊनच्या काळात ही किंमत ३००० पर्यंत गेल्याचे त्या सांगतात. त्यांच्याकडे १५० च्या वर श्वान आहेत. त्यांना महिन्याला २०० किलो खाद्य म्हणजे १० बॅग लागतात. याचा अर्थ महिन्याला ७००० रुपये अधिकचे मोजावे लागत आहेत.
दुधाचे दरही लिटरमागे दोन ते तीन रुपये वाढले असल्याचे दिसून येते. केवळ तांदूळ आहेत त्या दराने मिळत असल्याचे दिसते.
शहरात ३० ते ४० टक्के घरांमध्ये श्वान पाळले जातात. याशिवाय गाई, म्हशी आदी जनावरे पाळणाºयांची संख्या खूप आहे. या महागाईचा फटका या जनावर मालकांनाही पडत आहे.