अनिल देशमुख सीबीआय धाड; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिमगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 24, 2021 14:17 IST2021-04-24T14:17:14+5:302021-04-24T14:17:45+5:30
Nagpur News माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी घातलेल्या धाडींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नावाने शिमगा केला.

अनिल देशमुख सीबीआय धाड; राष्ट्रवादी काँग्रेस कार्यकर्त्यांचा शिमगा
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर: माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या निवासस्थानासह अन्य ठिकाणी सीबीआयच्या पथकाने शनिवारी सकाळी घातलेल्या धाडींच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारच्या नावाने शिमगा केला. यावेळी त्यांनी घोषणाबाजी करून सीबीआयच्या कारवाईविरुद्ध निषेध नोंदवला.
अनिल देशमुख यांच्या निवासस्थानी सीबीआयचे पथक आल्याची बातमी वाऱ्यासारखी नागपुरात पसरली. ती बातमी कळताच राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी देशमुख यांच्या निवासस्थानी धाव घेतली. तेथे कडेकोट बंदोबस्त असल्याने त्यांना आत प्रवेश मिळाला नाही. तेथे जमा झालेल्या कार्यकर्त्यांनी या धाडींचा निषेध करीत घोषणाबाजी केली.