शहरं
Join us  
Trending Stories
1
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
2
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
3
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
4
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
5
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
6
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
7
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
8
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
9
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
10
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
11
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
12
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते प्रतापराव भोसले यांचे निधन
13
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
14
राष्ट्रवादीकडे त्यावेळी मुख्यमंत्रीपदासाठी योग्य उमेदवार नव्हता; शरद पवारांनी सगळंच सांगितलं
15
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
16
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
17
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
18
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
19
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार
20
गॅसच्या टँकरचा भीषण स्फोट, आगीत घरे व वाहने भक्ष्यस्थानी; शेलपिंपळगावातील घटना

नागपुरातील आनंद शिरपूरकर हत्याकांडातील आरोपीच्या घरावर संतप्त जमावाचा हल्ला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 01, 2019 7:59 PM

एका सुस्वभावी तरुणाची हत्या करणारा कुख्यात गुंड रितेश शिवरेकर याच्या घरावर संतप्त जमावाने बुधवारी रात्री हल्ला चढवला. घरावर जोरदार दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली. या प्रकारामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरीनगर भुतेश्वर मंदीराजवळच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन जमावाला कसेबसे शांत केले.

ठळक मुद्देदगडफेक, वाहनांची जाळपोळ : गुजरीनगरात प्रचंड तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : एका सुस्वभावी तरुणाची हत्या करणारा कुख्यात गुंड रितेश शिवरेकर याच्या घरावर संतप्त जमावाने बुधवारी रात्री हल्ला चढवला. घरावर जोरदार दगडफेक करून वाहनांची जाळपोळ केली. या प्रकारामुळे कोतवाली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गुजरीनगर भुतेश्वर मंदीराजवळच्या परिसरात तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी वेळीच धाव घेऊन जमावाला कसेबसे शांत केले.सोमवारी रात्री १० च्या सुमारास आरोपी रितेश शिवरेकर (वय २२), प्रफुल्ल शिवरेकर, समीर शेंडे, प्रदीप काळे (सर्व रा. गुजरनगर) तसेच यश गोस्वामी (रा. पारडी) यांनी उधारीच्या पैशाच्या वादातून आनंद प्रभाकर शिरपूरकर नामक तरुणाची हत्या केली होती. तर, त्याच्या मदतीला धावलेल्या प्रवीण चंद्रदर्शन रंगारी याला गंभीर जखमी केले होते. या प्रकरणात पोलिसांनी उपरोक्त पाचही आरोपींना अटक केली आहे. आरोपी रितेश आणि त्याचा भाऊ गुजरीनगरात अवैध धंदे करतात. जुगार अड्डे चालवितात. गोरगरिबांना पैसे उधार देऊन त्यांच्याकडून दाम दुप्पट रक्कम वसूल करतात. त्यांच्या या गोरखधंद्यात आनंद शिरपूरकर अडसर ठरला होता. त्यामुळे आनंदकडून १५ हजार रुपये उधार घेणारा आरोपी रितेशने रक्कम परत न करता त्याच्यासोबत वाद घातला आणि सोमवारी रात्री १० च्या सुमारास त्याची निर्घृण हत्या केली.आनंदला वाचवू पाहणारा त्याचा मित्र प्रवीण यालाही आरोपीने गंभीर जखमी केले. परिसरासत आपली दहशत निर्माण करण्यासाठी आरोपींनी एका निरपराध तरुणाची हत्या केल्यामुळे या भागातील रहिवाश्यांमध्ये तीव्र रोष निर्माण झाला आहे. आरोपींना चिथावणी देणा-या त्याच्या नातेवाईकांविरुद्ध कोतवाली पोलिसांनी कारवाई करावी, अशी संतप्त नागरिकांची मागणी आहे. पोलिसांकडून दाद मिळत नसल्याचे पाहून संतप्त जमावाने बुधवारी रात्री आरोपी शिवरेकरच्या घरावर जोरदार हल्ला केला. तुफान दगडफेक करून हत्येचा निषेध नोंदविला. एवढेच नव्हे तर जमावाने आरोपींच्या घरासमोर ठेवलेल्या वाहनांना पेटवून दिले. या घटनेमुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. माहिती कळताच कोतवाली पोलीस तेथे पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले.बदला घ्यायचा आहे !आरोपींनी आनंदची हत्या केली त्याचा बदला घ्यायचा आहे, अशी भाषा संतप्त जमाव वापरत होता. त्यामुळे शिवरेकरच्या नातेवाईकांनी तेथून त्यावेळी पळ काढला. दरम्यान, माहिती कळताच कोतवालीचा पोलीस ताफा तेथे पोहचले. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. त्यानंतर चिरत रामकृष्ण शिवरेकर (वय ५९) यांची तक्रार नोंदवून घेत विक्की संतोष तिवारी, अमित अरुण ढांडे, सौरभ मुनीश्वर चिचिरमारे, चंद्रदर्शन लहानु रंगारी आणि शरद यशवंतराव दुधे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMurderखून