संतप्त प्रियकराने पतीसमोर काढली पूर्वीच्या प्रेयसीची छेड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2021 22:30 IST2021-12-29T22:30:10+5:302021-12-29T22:30:36+5:30

एका युवकाने पतीसोबत जात असलेल्या आपल्या जुन्या प्रेयसीशी दिवसाढवळ्या छेडखानी करून कारची तोडफोड केली. ही घटना नागपुरातील सक्करदराच्या तुकडोजी पुतळा चौकात घडली.

An angry lover teases his ex-girlfriend in front of her husband | संतप्त प्रियकराने पतीसमोर काढली पूर्वीच्या प्रेयसीची छेड

संतप्त प्रियकराने पतीसमोर काढली पूर्वीच्या प्रेयसीची छेड

नागपूर : एका युवकाने पतीसोबत जात असलेल्या आपल्या जुन्या प्रेयसीशी दिवसाढवळ्या छेडखानी करून कारची तोडफोड केली. ही घटना सक्करदराच्या तुकडोजी पुतळा चौकात घडली. पोलिसांनी आरोपी योगेश बबन बोराटे (२८) रा. रतननगर यास अटक केली आहे.

पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार योगेशची २८ वर्षीय विवाहितेसोबत १० वर्षांपूर्वी मैत्री झाली होती. त्यांच्या मैत्रीचे प्रेमात रूपांतर झाले. दोघांनी लग्न करण्याचे ठरवले, परंतु ते शक्य झाले नाही. यामुळे दोघेही विभक्त झाले. काही दिवसांपूर्वी युवतीचे लग्न झाले. तेव्हापासून योगेश संतप्त आहे. त्याने युवतीसोबत वाद घातला. याबाबत अजनी ठाण्यात तकार देण्यात आली आहे. मंगळवारी दुपारी युवती पतीसोबत कारने जात होती. योगेशने दोघांचा पाठलाग केला. त्याने तुकडोजी चौकात कारला थांबविले. युवतीसोबत आपत्तीजनक व्यवहार केला. त्याचा विरोध केला असता कारच्या काचा फोडल्या. युवतीच्या पतीने दिलेल्या सूचनेवरून सक्करदरा पोलीस घटनास्थळी पोहोचले. त्यांनी योगेशला अटक केली.

................

Web Title: An angry lover teases his ex-girlfriend in front of her husband