अंगणवाड्यांना मिळणार युडायस क्रमांक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 29, 2021 04:06 IST2021-03-29T04:06:24+5:302021-03-29T04:06:24+5:30
नागपूर : राज्यातील प्रत्येक शाळांना जसा युडायस क्रमांक आहे. तसा क्रमांक आता अंगणवाड्यांनाही मिळणार आहे. शासन जिल्हा परिषदेच्या ...

अंगणवाड्यांना मिळणार युडायस क्रमांक
नागपूर : राज्यातील प्रत्येक शाळांना जसा युडायस क्रमांक आहे. तसा क्रमांक आता अंगणवाड्यांनाही मिळणार आहे. शासन जिल्हा परिषदेच्या शाळा लगतच्या अंगणवाड्या लिंक करणार आहे. अंगणवाडी अधिक दर्जेदार करण्यासोबतच जिल्हा परिषदेच्या शाळातील विद्यार्थी संख्या वाढविण्याचा त्यामागचा हेतू आहे.
सद्य:स्थितीत मोजक्याच अंगणवाड्यांची स्थिती चांगली आहे. अनेक अंगणवाड्या किरायाच्या इमारतीत आहेत. त्या मालकीच्या इमारतीत स्थानांतरित करण्याच्या प्रयत्नात जिल्हा परिषद असून १०० वर अंगणवाड्यांचे बांधकाम करण्यात येणार आहे. एक शाळा एक अंगणवाडी किंवा एक शाळा दोन-तीन अंगणवाडी या तत्त्वावर अंगणवाड्या शाळांना लिंक करण्याचे आदेश शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांनी दिले आहेत. जिल्हा परिषद अंतर्गत २४२३ अंगणवाड्या आहेत. यातील काही अंगणवाड्या आधीच शाळा इमारतीत आहेत. त्यामुळे २३५८ अंगणवाड्या या लगतच्या शाळांना लिंक करण्यात येणार आहेत. अंगणवाड्या लिंक केल्यामुळे शासनाकडून जो शाळांना निधी देण्यात येतो, त्याचा अप्रत्यक्षपणे फायदा अंगणवाड्यांनाही होणार आहे. शाळांमध्ये अंगणवाडी असल्यास पालकांना दुसरीकडे जाण्याची गरज भासणार नाही. अंगणवाडीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर त्यांना पहिल्या वर्गात प्रवेश देण्यात येईल. यामुळे शाळांची पटसंख्या वाढविण्यासही मदत होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.