शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब किंग्सच्या विजयाने वाढली चेन्नई सुपर किंग्सची डोकेदुखी; Play off साठी ठोकली दावेदारी
2
"हिम्मत असेल, तर घोषणा करा..."! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधींना दिली 3 आव्हानं; बघा VIDEO
3
"पोलिसांनी त्याची हत्या केली..."! सलमान खान गोळीबार प्रकरणातील आरोपीच्या आत्महत्येला नवं वळण
4
MS Dhoni ने केला डॅरिल मिचेलचा अपमान? खवळला इरफान पठाण, Video Viral 
5
100 शाळा अन् 143 कॉल…; बॉम्बच्या धमकीनंतर दिल्ली सरकार अ‍ॅक्शन मोडवर, अ‍ॅडव्हायजरी जारी
6
जय श्रीराम! राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू अयोध्येत; रामलला चरणी नतमस्तक, शरयू नदीचे केले पूजन
7
“शरद पवारच माझे मुख्य प्रचारक, यशवंत चव्हाणांना भारतरत्न देण्याचे का सुचले नाही”: उदयनराजे
8
शरद पवारांनंतर उद्धव ठाकरेंनी भरसभेत मागितली माफी; PM मोदींवर केली टीका, म्हणाले...
9
"अडीच हजार फोन केले तेव्हा..., सगळे लफडे काढतो त्याचे"; चंद्रकांत खैरे संजय शिरसाटांवर एवढं का संतापले?
10
“नरेंद्र मोदींचा भटकत आहे आत्मा, कारण आम्हाला मविआचा करायचा आहे खात्मा”: रामदास आठवले
11
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाची पहिली बॅच ठरली; पाहा कोण कोण अमेरिकेला आधी जाणार
12
"ज्यांचे स्वतःचे मत या मतदारसंघात नाही, त्यांना लोकांच्या मताची किंमत काय कळणार?"
13
"तू माझ्या आयुष्यात नसतीस तर..."; विराट कोहलीची पत्नी अनुष्का शर्मासाठी खास रोमँटिक पोस्ट
14
"केंद्र सरकारच्या धोरणांमुळे शेतकरी संकटात, पण PM मोदी याकडे ढुंकूनही पाहायला तयार नाहीत"
15
ऋतुराज गायकवाडने इतिहास घडविला! MS Dhoni चा ११ वर्षांपूर्वीचा मोठा विक्रम मोडला 
16
T20 World Cup साठी टीम इंडियात निवड झाली अन् आयपीएलमध्ये घसरली कामगिरी
17
“लोकशाही, संविधान वाचवण्यासाठी केंद्रात इंडिया आघाडीची सत्ता आणा”; नाना पटोलेंचे आवाहन
18
महायुतीच्या जागावाटपाच्या तहात अजितदादा फसले; CM शिंदे मात्र वरचढ ठरले? चर्चांना उधाण
19
“माझा लोकांशी चांगला संपर्क, स्थानिक असल्याचा नक्कीच फायदा होईल”; भूषण पाटील स्पष्टच बोलले
20
सलमान गोळीबार प्रकरण: चौकशी अर्धवट असताना आरोपीची कोठडीत आत्महत्या; दुसऱ्या कैद्याने सांगितला घटनाक्रम

अन् मजुराची पत्नी ट्रकचालकाचे भक्ष्य होता होता वाचली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 23, 2020 11:19 AM

जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली केले.

ठळक मुद्देम्हणून ट्रकमध्ये बसण्याची वाटते भीती साक्षीदार जोडप्याने कथन केला प्रसंग

निशांत वानखेडे

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रकमध्ये बसवतो पण महिला केबिनमध्ये बसेल आणि माणसाला मागे बसावे लागेल, ही ट्रकचालकाची अट. बिहारकडे पायी जाणारे अगतिक मजूर जोडपे पर्याय दिसत नसल्याने बसण्यास तयार झाले. ट्रक भरधाव वेगाने निघाला तसा सावज मिळाल्याचा विचार बाळगून असलेल्या ट्रकचालकाची हालचाल सुरू झाली. जळगाव ते भुसावळ मार्गावरील नशिराबादजवळ त्याने थेट महिलेवर अतिप्रसंग करण्याचे प्रयत्न सुरू केले. तिची आरडाओरड जवळच असलेल्या गावकऱ्यांनी ऐकली आणि ट्रकच्या दिशेने धाव घेतली. ट्रक थांबवून ट्रकचालकाला चांगला चोप दिला आणि त्याला नशिराबाद पोलिसांच्या हवाली केले. एक अगतिक महिला नराधमाचे भक्ष्य होता होता वाचली.जळगाववरून एसटी बसने रात्री २ वाजताच्या सुमारास नागपूरला आलेले काही मजूर पांजरी नाक्यावर थांबले. त्यातीलच नितीन व रंजना या मजूर दाम्पत्याला यवतमाळ जिल्ह्यात मुकुटबन येथे जायचे होते. सकाळी नाक्यावर पोहचलेल्या संघर्ष वाहिनीच्या टीमने या जोडप्याला त्यांच्या गावी पोहचण्यासाठी ट्रकमध्ये व्यवस्था केली तेव्हा त्यांनी ट्रकमध्ये बसण्यास नकार दिला आणि बिहारच्या जोडप्यासोबत घडलेल्या थरारक प्रसंगाचे कथन केले. हे जोडपेही जळगाव येथून गावी यवतमाळला येण्यासाठी निघाले होते. रस्त्यावर उभे असताना त्याच नराधम ट्रकचालकाने यांनाही त्याच अटीसह ट्रकमध्ये बसण्यास सांगितले पण यांनी त्याला नकार दिला. मात्र त्यांच्याच सोबत असलेले बिहारचे दाम्पत्य ट्रकमध्ये बसले. त्यानंतर मागहून आलेल्या दुसऱ्या ट्रकमध्ये २०-२५ इतर मजुरांसह आम्ही बसल्याचे नितीनने सांगितले. नशिराबाद येथे पोहचल्यानंतर हा ट्रक दिसला. संतप्त गावकऱ्यांनी आमचाही ट्रक रोखला आणि घडलेला प्रसंग समजला. गावकऱ्यांनी त्या ट्रकचालकला पोलिसांच्या स्वाधीन केल्याचे कळले. ते जोडपेही पोलीस स्टेशनमधेच होते. यानंतर आम्ही बसलेला ट्रकचालकही गावकऱ्यांच्या दबावामुळे आम्हाला सोडून निघून गेला. त्यानंतर पोलिसांनी जळगाव नागपूर बसमध्ये आमची व्यवस्था केली आणि आम्ही इथवर पोहोचल्याचे नितीनने सांगितले.

मोबाईल विकून निघालोनितीन जळगाव येथे एका कंपनीत कामाला असून पत्नीसह राहतो. वर्षभरापूर्वीच त्यांचे लग्न झाले आहे. लॉकडाऊन लागल्यानंतर मालकाने ४००० रु दिले. मात्र दोन महिन्यात घरभाडे व इतर खर्चात हा पैसा संपला. नाईलाज असल्याने गावी मुकुटबनला निघण्याचे ठरविले. स्वत:जवळचा मोबाईल ४०० रुपयात विकला आणि गावचा रस्ता धरला. हे पैसे ट्रकवाल्याला दिले. आता एक रुपया खिशात नाही. एसटी बसने नि:शुल्क नागपूरपर्यंत आणले.

 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसMolestationविनयभंग