शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अन् रेल्वे ‘प्लॅटफॉर्म’वरच झाली प्रसूती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2018 8:06 PM

मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्लॅटफॉर्म’च्या परिसरात तान्हुलीच्या रडण्याचा आवाज आला अन् उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची बरसात झाली. चक्क ‘प्लॅटफॉर्म’वर जन्म झालेल्या बालिकेचे या जगात झालेले स्वागत सर्वांनी अक्षरश: टाळ्याच्या कडकडाटात केले.

ठळक मुद्देनागपूर रेल्वे स्थानकावरील घटना : कर्मचाऱ्यांनी दाखविली तत्परता

लोकमत न्यूज नेटवर्क   नागपूर : मंगळवारी सकाळी दररोजप्रमाणे नागपूर रेल्वे स्थानकावर प्रवाशांची ये-जा सुरू होती. अचानक ‘प्लॅटफॉर्म’ क्रमांक तीनवर वेदनांनी विव्हळणाऱ्या एका महिलेकडे सर्वांचे लक्ष वेधल्या गेले. पोलीस, रेल्वे कर्मचारी व वैद्यकीय पथकाची धावपळ सुरू झाली. काही वेळातच ‘प्लॅटफॉर्म’च्या परिसरात तान्हुलीच्या रडण्याचा आवाज आला अन् उपस्थितांच्या डोळ्यातून आनंदाश्रूंची बरसात झाली. चक्क ‘प्लॅटफॉर्म’वर जन्म झालेल्या बालिकेचे या जगात झालेले स्वागत सर्वांनी अक्षरश: टाळ्याच्या कडकडाटात केले.चक्रधरपूर निवासी कुंदन मुंडा (३५) हे पुणे येथे कार्यरत आहेत. आपली गर्भवती पत्नी अगस्ती मुंडा (२५) व आपल्या मुलासह ते गाडी क्रमांक १२१२९ आझादहिंद एक्स्प्रेसने पुण्याहून चक्रधरपूरकडे चालले होते. नागपूर स्थानकानजीकच अगस्ती मुंडा यांना प्रसववेदना सुरू झाल्या. एस-८ मधील सहप्रवाशांनी तत्काळ याची माहिती तिकीट तपासणी कर्मचाºयांना दिली. त्यानंतर त्वरित नागपूर रेल्वे स्थानकातील उपस्टेशन व्यवस्थापक (वाणिज्य) यांना संपर्क करण्यात आला. तातडीने रेल्वे प्रशासनाने पावले उचलण्यास सुरुवात केली व गाडी ‘प्लॅटफॉर्म’वर येत असताना रेल्वेच्या वैद्यकीय तज्ज्ञ डॉ.श्रीजा यादेखील पोहोचल्या. ‘आरपीएफ’ जवान व सफाई कर्मचारी ‘प्लॅटफॉर्म’वर एकत्र झाले होते. गाडी थांबताच महिलेला त्वरित उतरविण्यात आले. मात्र वेदना जास्त प्रमाणात होत असल्याने त्यांना त्वरित ‘प्लॅटफॉर्म’वरील ‘वॉटर वेन्डिंग मशीन’जवळील ‘बेंच’वर ठेवण्यात आले. चारी बाजूंनी चादर लावण्यात आली व डॉ.श्रीजा यांनी वैद्यकीय पथकाच्या मदतीने तेथेच प्रसूती केली. अगस्ती मुंडा यांनी एका निरोगी बालिकेला जन्म दिला. त्यानंतर आई व मुलीला तत्काळ मेयो इस्पितळात दाखल करण्यात आले. दरम्यान, ही धावपळ होत असताना अनेक लोकांची तेथे गर्दी जमली होती. प्रत्येक जणच प्रार्थना करत होता. प्रसूती झाल्यानंतर वैद्यकीय तज्ज्ञांसह सर्वांनीच सुटकेचा नि:श्वास सोडला. विशेष म्हणजे कुंदन मुंडा यांच्याकडे तर बोलण्यासाठी शब्दच नव्हते. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांनी दाखविलेल्या तत्परतेला त्यांनी नमन केले.

टॅग्स :Nagpur Railway Stationरेल्वे स्टेशन नागपूरpassengerप्रवासी