अनंत कुमार होते समाज समर्पित व्यक्तिमत्त्व :संघाची श्रद्धांजली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 12, 2018 21:41 IST2018-11-12T21:38:51+5:302018-11-12T21:41:36+5:30
केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप्रिय नेतृत्व असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते प्रतिबद्ध स्वयंसेवकदेखील होते. आपला जीवनप्रवास पूर्ण करून ते ईश्वरचरणी लीन झाले. हे दु:ख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती लाभो हीच प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया भय्याजी जोशी यांनी दिली.

अनंत कुमार होते समाज समर्पित व्यक्तिमत्त्व :संघाची श्रद्धांजली
लोकमत न्यूज नेटवर्क
नागपूर : केंद्रीय संसदीय कार्यमंत्री अनंत कुमार यांच्या निधनानंतर संघ वर्तुळातदेखील शोककळा पसरली. अनंत कुमार यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे सरकार्यवाह भय्याजी जोशी यांनी श्रद्धांजली अर्पण केली. अनंत कुमार यांनी आपले आयुष्य समाजाला समर्पित केले होते. लोकप्रिय नेतृत्व असलेले नेते म्हणून त्यांची ओळख होती. तसेच ते प्रतिबद्ध स्वयंसेवकदेखील होते. आपला जीवनप्रवास पूर्ण करून ते ईश्वरचरणी लीन झाले. हे दु:ख सहन करण्याची त्यांच्या कुटुंबीयांना शक्ती लाभो हीच प्रार्थना असल्याची प्रतिक्रिया भय्याजी जोशी यांनी दिली.
अनंत कुमार यांचे मंत्रिमंडळातील वरिष्ठ सहकारी व केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक, जहाजबांधणी, जलसंपदामंत्री नितीन गडकरी यांनीदेखील त्यांना आदरांजली अर्पण केली. अनंत कुमार माझे घनिष्ठ मित्र होते. मी पक्षाध्यक्ष असताना ते पक्षाचे सरचिटणीस होते. तेव्हा आम्ही विरोधी पक्षात होतो. देशामध्ये अनेक संघर्ष कार्यक्रम आयोजन करण्यात त्यांचा मौलिक सहभाग होता. कर्नाटकात भाजपचा विस्तार करण्यात त्यांची सिंहाची भूमिका होती. मंत्री म्हणून त्यांनी उत्तम काम केले. मंत्रीमंडळात त्यांनी सांभाळलेल्या सर्वच खात्यावर आपल्या कार्याची छाप पाडली होती. त्यांच्या निधनामुळे मी कुटुंबातील लहान भाऊच गमावला आहे. त्यांचे अचानक निघून जाणे हा मोठा धक्काच आहे. ईश्वर त्यांच्या कुटुंबीयांना हा धक्का सहन करण्याची शक्ती देवो व त्यांच्या आत्म्यास शांती लाभो हीच प्रार्थना, अशा भावना गडकरी यांनी व्यक्त केल्या