Anand Mela at Sitabardi Metro Station on Republic Day | प्रजासत्ताकदिनी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर आनंद मेळा

प्रजासत्ताकदिनी सीताबर्डी मेट्रो स्टेशनवर आनंद मेळा

लोकमत न्यूज नेटवर्क 

नागपूर : महामेट्रोच्या वतीने प्रवाशांसाठी विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत. या उपक्रमांना नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. याच शृंखलेत महामेट्रोच्या वतीने प्रजासत्ताक दिनानिमित्त २३ ते २६ जानेवारीदरम्यान सकाळी १० ते रात्री ८ वाजेदरम्यान सीताबर्डी इंटरचेंज मेट्रो स्टेशनवर आनंद मेळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. यादरम्यान नागरिकांच्या मनोरंजनासाठी स्टेशनवर संगीतसंध्या आणि सीआरपीएफच्या वतीने बँड वादनाचे आयोजन करण्यात आले आहे. विविध वस्तू, दागिने आणि आरोग्यवर्धक वस्तूंचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. थेट शेतातून आलेल्या धान्याचे स्टॉल, महिला बचत गटातर्फे निर्मित घरगुती वस्तू, पदार्थ येथे विकण्यात येतील. नागपूरची विशेषता असलेल्या खाद्यपदार्थांचे स्टॉल्सही येथे लावण्यात येणार आहेत.

...............

Web Title: Anand Mela at Sitabardi Metro Station on Republic Day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.