शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वृद्ध महिला पडली, कार पडली... पुढचा नंबर कुणाचा? जीर्ण पुलाच्या प्रश्नावर युवकाचे अनोखे आंदोलन

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2025 11:36 IST

घाण पाण्यात उतरून प्रशासनाच्या निष्क्रियतेचा जाहीर निषेध; ब्रिटिशकालीन पुलावर मृत्यूचा सापळा

क्षितिजा देशमुख

केळवद, (नागपूर) : नागपूर–छिंदवाडा राष्ट्रीय महामार्गावरील केळवद गावातील पुलावर सुरक्षा कठडे नसल्यामुळे सातत्याने अपघात घडत असतानाही प्रशासनाकडून दुर्लक्ष होत असल्याच्या निषेधार्थ युवक अक्षय भुजाडे यांनी रविवारी सकाळी अकरा वाजता थेट नाल्यात उतरून अनोखे आंदोलन सुरू केले. या आंदोलनामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. केळवद गाव दोन भागांत विभागले गेले असून ग्रामपंचायत, बाजारपेठ व प्राथमिक आरोग्य केंद्रात जाण्यासाठी नागरिकांना याच पुलावरून ये-जा करावी लागते. मात्र पुलावर आजतागायत कोणतेही सुरक्षा कठडे नसल्याने लहान मुले, वृद्ध आणि वाहनचालकांच्या जीविताला मोठा धोका निर्माण झाला आहे.

सुमारे पंधरा दिवसांपूर्वी रात्रीच्या सुमारास एक वृद्ध महिला या पुलावरून थेट नाल्यात कोसळली होती. वेळीच अक्षय भुजाडे व ग्रामस्थांनी धाव घेऊन तिचा जीव वाचवला. त्यानंतर ग्रामपंचायतीकडे तातडीने तात्पुरते तरी कठडे बसवावेत, अशी मागणी करण्यात आली होती. मात्र प्रशासनाकडून कोणतीही ठोस कारवाई झाली नाही.

शनिवारी पुन्हा एक गंभीर घटना घडली. एका चारचाकी वाहनाचा तोल जाऊन ते थेट नाल्यात कोसळले. ग्रामस्थांच्या मदतीने वाहन बाहेर काढण्यात आले. वारंवार अपघात होऊनही प्रशासनाकडून केवळ दुर्लक्षच सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

या पार्श्वभूमीवर प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी अक्षय भुजाडे यांनी थेट नाल्यात उतरून आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ग्रामपंचायत लेखी स्वरूपात तातडीने सुरक्षा कठडे बसविण्याचे आश्वासन देत नाही, तोपर्यंत आंदोलन मागे घेणार नाही, अशी ठाम भूमिका त्यांनी घेतली आहे.

दरम्यान, ग्रामपंचायत सचिवांनी दूरध्वनीवरून आंदोलन स्थगित करण्याची विनंती केली असली तरी आंदोलक आपल्या मागणीवर ठाम राहिले आहेत. सोमवारी केळवद पोलीस ठाण्यात निवेदन देऊन, भविष्यात या ठिकाणी एखादी दुर्दैवी घटना घडून जीवितहानी झाल्यास त्यास प्रशासन जबाबदार धरून गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी मागणी करण्यात येणार आहे.

या आंदोलनाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून, “आधी दुर्घटना, मग कारवाई?” असा सवाल ग्रामस्थांकडून उपस्थित केला जात आहे. प्रशासनाने तातडीने दखल घेऊन पुलावर सुरक्षा कठडे बसवावेत, अशी जोरदार मागणी होत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Youth protests dilapidated bridge after accidents, demands safety measures.

Web Summary : A youth in Kelvad protested in a drain after repeated accidents on a bridge lacking safety barriers. He demands immediate installation of safety railings following accidents involving an elderly woman and a car. Villagers demand immediate action from the administration.
टॅग्स :nagpurनागपूर