जुना वाद उकरला, पोटात चाकू भोसकला; चौघांना अटक

By दयानंद पाईकराव | Updated: June 29, 2024 19:47 IST2024-06-29T19:46:56+5:302024-06-29T19:47:05+5:30

पाचपावली ठाण्याच्या हद्दीतील घटना

An old dispute broke out, a knife stabbed in the stomach; Four arrested | जुना वाद उकरला, पोटात चाकू भोसकला; चौघांना अटक

जुना वाद उकरला, पोटात चाकू भोसकला; चौघांना अटक

नागपूर : जुना वाद उकरून काढून पोटात चाकु मारीत गंभीर जखमी करणारे तीन भाऊ आणि त्यांच्या एका साथीदाराला पाचपावली पोलिसांनी अटक केली आहे. ही घटना शुक्रवारी २८ जूनला रात्री ११.३० वाजताच्या सुमारास पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली.

जमीर साबीर शेख (२०), समीर साबीर शेख (२१), अमीर साबीर शेख (१९), मोहसीन उर्फ बाबु रफिक शेख (२३) सर्वजण रा. ज्योतीनगर पाचपावली अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. तर सय्यद सिप्टेन सय्यद रिजवान (१८, रा. ज्योतीनगर पाचपावली) असे या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या युवकाचे नाव आहे. आरोपी आणि गंभीर झालेला युवक हे मित्र असून ते एकाच गल्लीत राहतात. शुक्रवारी रात्री ११.३० वाजता ते पाचपावली पोलिस ठाण्याच्या हद्दीत गरीब नवाज चौक, ज्योतीनगरकडे जाणाºया रस्त्यावर अभिनव हॉस्पीटलजवळ भेटले. यात आरोपी शेख बंधुंनी जुना वाद उकरून काढला. त्यानंतर त्यांनी आपला साथीदार मोहसीन उर्फ बाबुसोबत संगणमत करून लाथाबुक्क्यांनी सय्यद सिप्टेनला मारहाण केली.

आरोपी जमीर शेख याने आपल्याजवळील चाकुने सिप्टेन उर्फ बाबुच्या पोटावर उजव्या बाजुला वार करून त्याला गंभीर जखमी केले. जखमी सय्यद सिप्टेनला उपचारासाठी खासगी रुग्णालयात व तेथून मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आले. रिजवान अजीज पाशा (४७, रा. ज्योतीनगर पाचपावली) यांनी दिलेल्या तक्रारीवरून पाचपावली ठाण्याचे उपनिरीक्षक सुनिल तिडके यांनी आरोपींविरुद्ध ३०७, ३२३, ३४ नुसार गुन्हा दाखल करून त्यांना अटक केली आहे.
...........

Web Title: An old dispute broke out, a knife stabbed in the stomach; Four arrested