शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
7
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
8
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
9
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
10
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
11
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
12
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
13
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
14
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
15
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
16
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
17
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
18
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
19
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा
20
“लाल संविधान घेऊन फिरणारे राहुल गांधी...”; सावरकरांवरील विधान प्रकरणी CM फडणवीसांचा पलटवार

सणासुदीच्या तोंडावर डेंग्यूने वाढवली चिंता, रोज चार रुग्णांची भर

By सुमेध वाघमार | Updated: August 18, 2023 17:45 IST

१५ ऑगस्टपर्यंत ५९ रुग्णांची नोंद

नागपूर : सणासुदीच्या तोंडावर डेंग्यूचा प्रकोप वाढतच चालला आहे. शासकीयसह खासगी रुग्णालयात या आजाराच्या रुग्ण दिसून येत आहेत. मागील १५ दिवसांत डेंग्यूचे ५९ रुग्णांची नोंद झाली आहे. रोज जवळपास चार रुग्ण आढळून येत असल्याने चिंता वाढली आहे. 

डेंग्यूवर स्पष्ट उपचार किंवा अ‍ॅण्टीबायोटिक किंवा अ‍ॅण्टीव्हायरल औषध नाही. आजार गंभीर झाल्यास थेट मृत्यूचा धोका संभवतो. या आजाराचे सर्वाधिक रुग्ण २०२१ मध्ये आढळून आले होते. त्यावेळी नागपूर शहरात १ हजार २५४ रुग्णांची नोंद झाली होती. त्या तुलनेत २०२२ मध्ये केवळ ११८ रुग्ण होते. परंतु या वर्षी रुग्ण वाढताना दिसून येत आहे.  जानेवारीत ५, फेब्रुवारीत ४, मार्चमध्ये ४, एप्रिलमध्ये ३, मेमध्ये २, जूनमध्ये ५५, जुलैमध्ये ७८ तर १५ ऑगस्टपर्यंत ५९ असे एकूण २१० रुग्णांची नोंद झाली आहे. 

- १५ दिवसांत १,२४५ संशयित रुग्ण

नागपूर शहरात जुलै महिन्यापर्यंत डेंग्यू संशयीत रुग्णांची संख्या ५६६ असताना मागील १५दिवसांत १,२४५ संशयितांची भर पडली. सध्या १,८०१ रुग्ण आहेत. या रुग्णांची लक्षणे डेंग्यू सारखीच असल्याने घराघरांमध्ये भीतीचे वातावरण आहे. 

- डेंग्यूपासून असा करा बचाव

: लहान मुलांना पूर्ण हातांचे कपडे घाला: कु लरच्या टाकीत पाणी जमा होणार नाही याची काळजी घ्या: घरात व आसपासच्या परिसरात स्वच्छता ठेवा व कोठेही पाणी साठू देऊ नका: रात्री झोपताना मछरदाणीचा वापर करा.: लहान मुलांच्या खाण्यापिण्याची विशेष काळजी घ्यावी.: कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांना दाखवा.

टॅग्स :Healthआरोग्यdengueडेंग्यूnagpurनागपूर