शहरं
Join us  
Trending Stories
1
"भारतावर टीका करणारे देशच रशियासोबत व्यापार करताहेत"; ट्रम्प यांना भारताने दाखवला आरसा, आकडेवारीसह सुनावले
2
"...त्यामुळे मी भारतावरील टॅरिफ भरपूर वाढवणार आहे"; अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा इशारा
3
DSP सिराजचा ऑन ड्युटी फॉर्म्युला! सर्वाधिक विकेट्स अन् १००० पेक्षा अधिक चेंडू टाकण्याचा मोठा पराक्रम
4
धक्कादायक! नागपुरात भर रस्त्यावर महिला पोलिसाला मारहाण करत विनयभंग
5
मोबाईलसाठी रेल्वेतील प्रवाशाच्या हातावर फटका, तरुणाने गमावला पाय; २० हजार रुपयेही पळवले
6
Pahalgam Attack: ते दहशतवादी पाकिस्तानी असल्याचे लष्कराने म्हटले नाही; संरक्षण मंत्रालयाचा खुलासा
7
१२,००० सॅमसंग स्मार्टफोनने भरलेला ट्रक चोरीला गेला; चोरट्यांनी ९१ कोटींच्या वस्तू लंपास केल्या
8
IND vs ENG : एक मालिका अन् दोन मालिकावीर! गंभीरमुळं गिलसोबत हॅरी ब्रूकला मिळाला हा पुरस्कार
9
अमित शाह मोडणार देशाच्या गृहमंत्र्यांचा रेकॉर्ड! जम्मू काश्मीरबद्दल सरकार घेणार आणखी एक मोठा निर्णय?
10
मारहाण, शिवीगाळ असं काहीच घडलं नाही; पुणे पोलिसांनी मुलींचे सगळेच आरोप फेटाळले
11
'भारत आगीशी खेळत आहे'; डोनाल्ड ट्रम्प, एस. जयशंकर यांच्याबद्दल खोटी विधाने केली पोस्ट, 'एक्स'ने खातीच केली बंद
12
iPhone 16: पहिल्यांदाच आयफोन १६ च्या खरेदीवर एवढी मोठी सूट!
13
भारत रशियाला युक्रेनविरुद्ध युद्धासाठी अप्रत्यक्षपणे निधी पुरवतोय, अमेरिकेचा आरोप!
14
येमेनमध्ये निमिषा प्रियाच्या अडचणी वाढल्या! मृताच्या भावाने पत्र लिहून केली मोठी मागणी
15
Siraj, IND vs ENG: 'तो' एक शब्द अन् सिराजने फिरवला अख्खा सामना... टीम इंडियाच्या विजयानंतर उघड केलं गुपित
16
आपच्या सत्येंद्र जैन यांना दिलासा, CBIच्या क्लोजर रिपोर्टवर कोर्टाचं शिक्कामोर्तब
17
माझा 'तो' व्हिडीओ रोहित पवारांना कुणी पाठवला? मंत्री मेघना बोर्डीकर म्हणाल्या...
18
राज ठाकरेंच्या 'मराठी'नंतर नितीश कुमारांची 'बिहारी' घोषणा; शिक्षक भरतीत नोकरी बिहारींनाच मिळणार
19
Siraj, IND vs ENG: ‘पूरा खोल दिए पाशा...’; सिराजच्या 'मॅचविनिंग' गोलंदाजीवर ओवेसींची हैदराबादी शैलीत स्तुती
20
कमाल झाली राव! रशियन महिलेने सांगितली भारतीय पुरुषाशी लग्न करण्याची खास कारणं, जिंकलं मन

धक्कादायक! उपराजधानीतील अट्टल गुन्हेगारांमध्ये आढळले चक्क एमबीबीएस, लॉ व पीएचडीधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 2, 2021 07:05 IST

Nagpur News उपराजधानीत गेल्या १० वर्षांत हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील १३८ आरोपी चांगले शिकले सवरलेले आहेत. एमबीबीएस, पीएच.डी आणि लॉ केलेल्यांचाही यात समावेश आहे.

ठळक मुद्दे१३८ शिक्षितांचे हात रक्तांनी माखलेलेअभ्यास अहवालातून धक्कादायक वास्तव उजेडात

नरेश डोंगरेनागपूर - उच्चशिक्षित मंडळी हत्येसारखे गंभीर गुन्हे करत नाही, हा समज सपशेल खोटा आहे. उपराजधानीत गेल्या १० वर्षांत हत्येसारख्या गंभीर गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्यातील १३८ आरोपी चांगले शिकले सवरलेले आहेत. एमबीबीएस, पीएच.डी आणि लॉ केलेल्यांचाही यात समावेश आहे. नागपूर पोलिसांकडून करवून घेण्यात आलेल्या एका अभ्यास पाहणीनंतरच्या अहवालातून हे धक्कादायक वास्तव उजेडात आले आहे.नागपुरातील पोलीस अधिकाऱ्यांकडून आटोकाट प्रयत्न करूनही हत्येचे गुन्हे थांबताना दिसत नाहीत. छोट्या छोट्या कारणामुळे घडलेल्या हत्येच्या गुन्ह्यात सराईत गुन्हेगारांचा समावेश असतो तसे नवखे गुन्हेगारही दिसून येतात. नागपुरातील हत्येच्या गुन्ह्यांची तुलना अन् चर्चा एनसीआरबीच्या माध्यमातून देशातील विविध प्रांताशी अन् महानगराशी केली जाते. यामुळे नागपूरला 'क्राईम कॅपिटल' असेही संबोधले जाते. या एकूणच प्रकारामुळे राज्य सरकार अन् खास करून गृहमंत्रालय कमालीचे अस्वस्थ झाले आहे. या पार्श्वभूमीवर, १९ ऑक्टोबर २०२१ ला गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी नागपूरात शिर्षस्थ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत नागपुरातील बॉडी अफेन्स, खास करून हत्येच्या गुन्ह्यांची कारणं जाणून घेण्याचा प्रयत्न झाला. सोबतच हत्येच्या गुन्ह्यातील आरोपींची शैक्षणिक पात्रताही चचेर्ला आली. ती चक्रावून सोडणारी आहे.

विशेष म्हणजे, पोलीस आयुक्त अमितेशकुमार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी नागपुरातील हत्येच्या मालिकेची कारणं जाणून घेण्यासाठी आणि ही दुष्टमालिका थांबविण्यासाठी नॅशनल लॉ युनिव्हर्सिटीशी एक सामंजस्य करार केला. लॉ युनिव्हर्सिटीचे तज्ज्ञ आणि पोलीस उपायुक्तांसह काही अधिकारी या समितीत होते. त्यांनी गेल्या १० वर्षांतील हत्येच्या गुन्ह्यांचा अभ्यासपूर्ण आढावा घेतला. या गुन्ह्यात एकूण १०८६ आरोपींना अटक करण्यात आली. त्या आरोपींनी कोणत्या कारणामुळे हा गंभीर गुन्हा केला, आरोपींची मानसिकता, वय आणि शैक्षणिक पात्रता याचीही नोंद या अभ्यासात केली. तो अहवाल या बैठकीत सादर करण्यात आला. यात उजेडात आलेल्या पैलूंमध्ये सर्वात धक्कादायक पैलू आहे, आरोपींच्या शैक्षणिक पात्रतेचा. १०८६ आरोपींमध्ये तब्बल १३८ आरोपी शिक्षित-उच्चशिक्षित आणि अतिउच्चशिक्षित आहेत. ज्यात पोस्ट ग्रॅज्युएट, एमबीबीएस, लॉ आणि पीएच.डी. केलेल्या आरोपींचाही समावेश आहे. या आकडेवारीच्या तुलनेत कोणतेही शिक्षण न घेतलेल्या अर्थात पूर्णता अशिक्षित असलेल्या आरोपींची संख्या (कमी) ८३ आहे, हे विशेष.---हत्येच्या आरोपातील आरोपींची शैक्षणिक पात्रता आणि संख्याआयटीआय - पॉलिटेक्निक - ८इंजिनिअरिंग - ३अंडरग्रॅज्युएट - ११०पोस्ट ग्रॅज्युएट - १४पीएच.डी. - १लॉ - १एमबीबीएस - १------------------

टॅग्स :jailतुरुंग