अमोल ढाकेला सात दिवसांची पोलीस कोठडी

By Admin | Updated: December 9, 2014 00:59 IST2014-12-09T00:59:00+5:302014-12-09T00:59:00+5:30

भरतनगर पुराणिक ले-आऊट येथे सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा अमोल जगन्नाथ ढाके याला सोमवारी अंबाझरी

Amol Dhaka is a seven-day police cell | अमोल ढाकेला सात दिवसांची पोलीस कोठडी

अमोल ढाकेला सात दिवसांची पोलीस कोठडी

न्यायालय : गुंतवणूकदारांची फसवणूक
नागपूर : भरतनगर पुराणिक ले-आऊट येथे सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंट नावाने कंपनी उघडून आकर्षक व्याजाचे आमिष दाखवून गुंतवणूकदारांची फसवणूक करणारा अमोल जगन्नाथ ढाके याला सोमवारी अंबाझरी पोलिसांनी एमपीआयडी कायद्याच्या विशेष न्यायालयाचे न्यायाधीश व्ही. टी. सूर्यवंशी यांच्या न्यायालयाने १५ डिसेंबरपर्यंत सात दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचा आदेश दिला.
संजय प्रकाशराव काशीकर यांच्यासह १६ जणांची ४४ लाख १४ हजार रुपयांनी फसवणूक केल्यावरून अंबाझरी पोलिसांनी ३ डिसेंबर २०१४ रोजी सात्त्विक ग्रुप आॅफ इन्व्हेस्टमेंटचा मुख्य कार्यकारी संचालक अमोल ढाके, त्याची पत्नी प्रीती ढाके, महेंद्र कोहाढ, अतुल दीक्षित, संदीप महाजन आणि मोहन जोशी यांच्याविरुद्ध भादंविच्या ४२०, ४०६, ३४, महाराष्ट्र गुंतवणूकदार हितसंबंध संरक्षण अधिनियमाच्या कलम ३ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. काल अमोल ढाके याला रामनगर भागातून अटक करण्यात आली.
आज या आरोपीला तपास अधिकारी पोलीस निरीक्षक बाळासाहेब खाडे यांनी न्यायालयात हजर केले. आरोपी ढाके याने डिसेंबर २००५ ते एप्रिल २०१४ या काळात गुंतवणूकदारांना तिमाही, सहामाही आणि वार्षिक मुद्दल ठेवींवर आकर्षक व्याजाचे आमिष दाखवले. त्यामुळे अनेकांनी त्याच्या कंपनीत गुंतवणूक केली. गुंतवणूकदारांना इंडियन ओव्हरसिज बँक, समृद्धी को-आॅपरेटिव्ह बँक येथील कंपनीच्या खात्याचे व्याजासह आगाऊ रकमेचे चेक देण्यात आले होते. प्रॉमेसरी नोट (वचन चिठ्ठी) देण्यात आल्या होत्या. मुदतीचा काळ पूर्ण झाल्यानंतर गुंतवणूकदारांनी चेक संबंधित बँकांमध्ये वटविण्यास दिले असता, ते परत आले होते. पुढे ढाके याने मोबाईल संपर्कही तोडला होता. त्याने आपल्या कार्यालयालाही कुलूप ठोकले होते.
आरोपीने लुबाडलेली एकूण रक्कम किती, या रकमेतून कोणत्या मालमत्ता खरेदी केल्या याबाबत माहिती घेऊन त्या जप्त करणे आहे, वेगवेगळ्या बँक खात्यांचा शोध घेणे आहे, गुन्ह्यात सहभागी आरोपींना अटक करणे आहे, आदी मुद्दे सरकार पक्षाच्या वतीने मांडून १५ दिवसांच्या पोलीस कोठडी रिमांडची मागणी करण्यात आली. आरोपीच्या वकिलांनी पोलीस कोठडीस विरोध केला. न्यायालयाने दोन्ही बाजू ऐकून आरोपीला १५ डिसेंबरपर्यंत पोलीस कोठडी रिमांड सुनावला. न्यायालयात सरकारच्या वतीने विशेष सरकारी वकील गिरीश दुबे तर आरोपीच्या वतीने अ‍ॅड. सागर आशिरगडे, अ‍ॅड. अभिनव मार्डीकर यांनी काम पाहिले. (प्रतिनिधी)

Web Title: Amol Dhaka is a seven-day police cell

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.