शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

अमित गांधीचे ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला आव्हान : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 25, 2019 9:22 PM

शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा गुन्हेगार अमित गजानन गांधी याने ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारने अमितला ३० वर्षे कारावासाच्या गटात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अमितचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध असून आपल्याला २२ वर्षे कारावासाच्या गटात टाकायला पाहिजे होते, असे त्याचे म्हणणे आहे.

ठळक मुद्देअल्पवयीन मुलीच्या बलात्कार व खून प्रकरणात शिक्षा भोगणारा कैदी

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शेजारी राहणाऱ्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार करून त्यानंतर तिला दगडाने ठेचून निर्दयीपणे ठार मारणारा गुन्हेगार अमित गजानन गांधी याने ३० वर्षे कारावासाच्या शिक्षेला मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात आव्हान दिले आहे. २१ एप्रिल २०१७ रोजी राज्य सरकारने अमितला ३० वर्षे कारावासाच्या गटात टाकण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर अमितचा आक्षेप आहे. हा निर्णय अवैध असून आपल्याला २२ वर्षे कारावासाच्या गटात टाकायला पाहिजे होते, असे त्याचे म्हणणे आहे.फौजदारी प्रक्रिया संहितेतील कलम ४३२ मध्ये बंदिवानांची शिक्षा स्थगित किंवा माफ करण्याची तरतूद आहे. त्यांतर्गत सर्वोच्च न्यायालयाने एका प्रकरणात १४ वर्षे कारावास भोगलेल्या कैद्याला मुक्त करण्याचा आदेश दिला होता. अमित १८ वर्षांवर काळापासून कारागृहात असून शिक्षा माफी पकडून त्याचा एकूण कारावास सुमारे २३ वर्षे होतो असे याचिकेत नमूद करण्यात आले आहे. अमितच्या वडिलांनी १२ एप्रिल २०१६ रोजी राज्य सरकारला अर्ज सादर करून त्याला कायमचे सोडण्याची मागणी केली होती. त्यावर निर्णय घेण्यात आला नाही म्हणून, अमितने उच्च न्यायालयात धाव घेतली होती. पात्र बंदिवानांना कायद्यातील तरतुदीनुसार कारागृहातून मुक्त करण्यासंदर्भात सरकारची भूमिका उदासीन आहे. त्यामुळे बंदिवानांच्या मानवाधिकारांचे उल्लंघन होत आहे असे त्याने याचिकेत म्हटले होते. त्या याचिकेत न्यायालयाने अमितच्या वडिलांच्या अर्जावर निर्णय घेण्यास सांगितले होते. त्यानुसार, राज्य सरकारने अमितला ३० वर्षे कारावासाच्या गटात टाकण्याचा निर्णय घेतला. अमितला जन्मठेपेची शिक्षा झाली असून त्यांतर्गत त्याला ३० वर्षाचा कारावास भोगावा लागणार आहे. त्यामध्ये विविध प्रकारे मिळणाऱ्या शिक्षामाफीचा कालावधी पकडला जाईल. न्यायालयाने सरकारचा हा निर्णय लक्षात घेता अमितची ती याचिका फेटाळून त्याला निर्णयाच्या वैधतेला आव्हान देण्याची मुभा दिली होती. त्यानुसार त्याने उच्च न्यायालयात नवीन याचिका दाखल करून या निर्णयाला आव्हान दिले. प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय प्रदीप देशमुख व रोहित देव यांच्यासमक्ष सुनावणी झाली. न्यायालयाने गृह विभागाचे सचिव, कारागृह महानिरीक्षक व नागपूर मध्यवर्ती कारागृह अधीक्षक यांना नोटीस बजावून यावर तीन आठवड्यात उत्तर दाखल करण्यास सांगितले. अमिततर्फे अ‍ॅड. नीतेश समुंद्रे यांनी कामकाज पाहिले.असे आहे अमितचे प्रकरणजुलै-१९९८ मध्ये अमितने शेजारीच राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला विविध प्रकारची आमिषे दाखवून सायकलने कोराडीतील श्री महालक्ष्मी जगदंबा मंदिरामागील निर्जन भागात नेले. घटनेपूर्वी त्या मुलीच्या व अमितच्या कुंटुंबाचे चांगले संबंध होते. त्यामुळे अमितच्या मनातील कट मुलीच्या लक्षात आला नव्हता. ती विश्वासाने अमितसोबत गेली होती. अमितने ओळखी व विश्वासाचा फायदा घेतला. त्या निर्जन ठिकाणी अमितने सुरुवातीला मुलीवर पाशवी बलात्कार केला. त्यानंतर मुलीचा दगडाने ठेचून निर्घृण खून केला. घटनेच्या दुसऱ्या दिवशी गुराख्याला मुलीचा मृतदेह आढळून आला होता. त्यानंतर पोलिसांनी तपासचक्रे फिरवून अमितला अटक केली. ३० ऑक्टोबर २००२ रोजी सत्र न्यायालयाने अमितला फाशीची शिक्षा सुनावली होती. उच्च न्यायालयाने फाशीची शिक्षा कायम ठेवली होती. परिणामी, अमितने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. सर्वोच्च न्यायालयाने अमितचे कमी वय लक्षात घेता फाशीची शिक्षा जन्मठेपेत परिवर्तित केली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयPrisonतुरुंग