उद्ध्वस्त स्मारकाच्या ढिगाऱ्यावर आंबेडकर जयंती साजरी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2023 22:25 IST2023-04-14T22:25:21+5:302023-04-14T22:25:54+5:30
Nagpur News अंबाझरी डाॅ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आंबेडकर भवनाच्या ढिगाऱ्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली.

उद्ध्वस्त स्मारकाच्या ढिगाऱ्यावर आंबेडकर जयंती साजरी
नागपूर : अंबाझरी डाॅ.आंबेडकर सांस्कृतिक भवन बचाव कृती समितीच्या वतीने शुक्रवारी उद्ध्वस्त करण्यात आलेल्या आंबेडकर भवनाच्या ढिगाऱ्यावर डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी मोठ्या संख्येने नागरिक सहभागी झाले होते.
आंबेडकर भवन बचाव कृती समितीच्या वतीने येथे दोन दिवसीय संयुक्त जयंतीचा कार्यक्रम आयोजित केला आहे. शुक्रवारी बाबासाहेबांना अभिवादन प्रसंगी ॲड.प्रदीप वाटोरे, ॲड.शैलेश नारनवरे, ॲड.अजय निकोसे, ॲड.भगवान लोणारे, ॲड.किरण वाठोरे यांना बुद्ध आणि त्याचा धम्म हा ग्रंथ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी किशोर गजभिये, बाळू घरडे, सरोज आगलावे, छाया खोब्रागडे, जनार्दन मून, सुगंधा खांडेकर, उज्ज्वला गणवीर, तक्षशीला वागधरे, उषा बौद्ध, सरोज डांगे आदी प्रामुख्याने उपस्थित होते.
उद्या शनिवारी दुपारी १ वाजता स्वराज इंडियाचे संस्थापक योगेंद्र यादव यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले आहे.