शहरं
Join us  
Trending Stories
1
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
2
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
3
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
4
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
5
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
6
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
7
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
8
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
9
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
10
चेहऱ्यावर मास्क, खांद्यावर बंदूक...; भारतात येणाऱ्या जहाजावर इराणी कमांडोंनी कसा केला कब्जा? बघा भरसमुद्रातला थरारक VIDEO
11
पुणेकर...! म्हाडाची २९५ घरे घेणार का ? प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य... कुठे, कुठे आहेत...
12
डोनाल्ड ट्रम्प यांच्या ‘हेलहोल’ टिप्पणीवर भारताची सावध भूमिका; परराष्ट्र मंत्रालयाने म्हटले...
13
हर्षवर्धन सपकाळ मातोश्रीवर गेले, उद्धव ठाकरे यांची भेट घेतली; कोणत्या विषयावर काय चर्चा झाली?
14
काळाचा घाला! उत्तराखंडच्या चंबा-कोटी रोडवर भीषण अपघात; बस दरीत कोसळून ८ जणांचा मृत्यू
15
कर्नाटक सरकारचे मराठी संपवण्याचे षडयंत्र! १० वीच्या निकालातून 'मराठी' शब्द गायब; सीमाभागात संताप
16
जगाचा इंटरनेट संपर्क तुटणार? इराणने होर्मुझ सामुद्रधुनीतील 'अंडर सी केबल्स'बाबतीत दिला थेट इशारा!
17
नागपूर हादरले! बेपत्ता हॉटेल मालकाचा नाल्यात पडलेल्या पोत्यात सापडला मृतदेह, 'हरी ओम' टॅटूमुळे पटली ओळख
18
"उद्धव ठाकरे लढणार असतील तर स्वागत; पण आताच..."; सावध झालेल्या काँग्रेसची मोठी मागणी, वडेट्टीवार काय म्हणाले?
19
Donald Trump : “तू जे केलंस ते खरोखरच अविश्वसनीय”; डोनाल्ड ट्रम्प यांनी केलं भारतीय टेनिसपटूचं भरभरून कौतुक
20
इस्लामाबादला धक्का! अमेरिका-ईरान डीलसाठी इराणला पाकिस्तानवर विश्वासच वाटेना; आता... 
Daily Top 2Weekly Top 5

अंबरिश आत्राम यांची हायकोर्टात हजेरी

By admin | Updated: January 7, 2016 03:50 IST

कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रकरणात आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश आत्राम यांनी धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने ...

अजामीनपात्र वॉरंट : कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनाचे प्रकरणनागपूर : कर्मचाऱ्यांच्या थकीत वेतनप्रकरणात आदिवासी विकास राज्यमंत्री अंबरिश आत्राम यांनी धर्मराव शिक्षण मंडळाचे अध्यक्ष या नात्याने बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात हजेरी लावली. ते दुपारी २.३० ते ४ वाजतापर्यंत न्यायालयात होते. प्रकरणावरील सुनावणी संपल्यानंतरच त्यांना परत जाता आले.यासंदर्भात विजय व सुनंदा बोडखे यांनी अवमानना याचिका दाखल केली होती. ते धर्मराव शिक्षण मंडळाद्वारे संचालित एटापल्ली येथील आश्रमशाळेत शिक्षक होते. मंडळाकडे त्यांचे ३० एप्रिल १९९३ ते ३० नोव्हेंबर २००९ पर्यंतचे वेतन थकीत होते. या प्रकरणात न्यायालयाने सुरुवातीला जामीनपात्र वॉरंट काढला होता. हा वॉरंट तामील झाला नाही. यामुळे न्यायालयाने अजामीनपात्र वॉरंट जारी करून मंडळाच्या अध्यक्षाला प्रत्यक्ष उपस्थित राहून स्पष्टीकरण सादर करण्यास सांगितले होते. त्यानुसार आत्राम हे न्यायालयात हजर झाले. तत्पूर्वी मंडळ व याचिकाकर्त्यांनी तडजोड केली. त्यात मंडळाने याचिकाकर्त्यांना पाच हप्त्यांमध्ये थकीत वेतन देण्याचे मान्य केले. मंडळाच्यावतीने यासंदर्भात न्यायालयात हमीपत्र सादर करण्यात आले. ही बाब लक्षात घेता न्यायालयाने याचिका निकाली काढली. प्रकरणावर न्यायमूर्ती झेड. ए. हक यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांतर्फे अ‍ॅड. पुरुषोत्तम पाटील तर, मंडळातर्फे अ‍ॅड. हरीश डांगरे यांनी बाजू मांडली.(प्रतिनिधी)असा आहे घटनाक्रममंडळाने तात्पुरती नियुक्ती असल्याचे कारण देऊन १९९३ मध्ये बोडखे दाम्पत्याची सेवा समाप्त केली होती. या आदेशाला बोडखे दाम्पत्याने शालेय न्यायाधिकरणात आव्हान दिले होते. शालेय न्यायाधिकरणाने त्यांना दिलासा दिला नाही. यामुळे त्यांनी उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली होती. एकल न्यायपीठाने त्यांची याचिका मंजूर केली. यामुळे मंडळाने उच्च न्यायालयाच्या युगुल न्यायपीठासमक्ष लेटर्स पेटेन्ट अपील (एलपीए) दाखल केले होते. युगुलपीठाने मंडळाचे अपील फेटाळून बोडखे दाम्पत्याला नोकरीवर रुजू करून घेण्याचे व ४० टक्के थकीत वेतन देण्याचे निर्देश दिले होते. मंडळाने थकीत वेतनासंदर्भातील निर्देशाचे पालन केले नाही. यामुळे बोडखे दाम्पत्याने उच्च न्यायालयात अवमानना याचिका दाखल केली होती.