शहरं
Join us  
Trending Stories
1
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
4
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
5
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
6
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
7
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
8
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
9
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
10
Video - निसर्गाच्या देणगीला भेसळीचा विळखा; तुम्ही पिताय ते नारळपाणी खरंच 'नॅचरल' आहे का?
11
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
12
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
13
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
14
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
15
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
16
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
17
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
18
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
19
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
20
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
Daily Top 2Weekly Top 5

आश्चर्यकारक : नागपुरात स्फटिकांची  दुनिया

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 13, 2018 00:15 IST

पृथ्वीच्या भूगर्भात दडलेला स्फटिक असा एक खनिज पदार्थ आहे, ज्यापासून रत्नांची निर्मिती होते, ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया रमण विज्ञान केंद्रात आयोजित फिरत्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. यात स्फटिकांचे सौंदर्य, त्यावरील संशोधने, भौतिक व रासायनिक गुणधर्म, इतिहासातील दाखले देण्यात आले आहे.

ठळक मुद्देरमण विज्ञान केंद्रात प्रदर्शन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : पृथ्वीच्या भूगर्भात दडलेला स्फटिक असा एक खनिज पदार्थ आहे, ज्यापासून रत्नांची निर्मिती होते, ज्याचा आधुनिक तंत्रज्ञानात मोठ्या प्रमाणात उपयोग होतो. या स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया रमण विज्ञान केंद्रात आयोजित फिरत्या प्रदर्शनात बघायला मिळत आहे. यात स्फटिकांचे सौंदर्य, त्यावरील संशोधने, भौतिक व रासायनिक गुणधर्म, इतिहासातील दाखले देण्यात आले आहे.स्फटिक एक दगडसदृश पदार्थ आहे. पण हा पदार्थ किती बहुमूल्य आहे, याची प्रचिती रमण विज्ञान केंद्रात आयोजित स्फटिकाची आश्चर्यकारक दुनिया या प्रदर्शनातून येते. स्फटिकाचे आरोग्यवर्धक गुणधर्म आहे. पण स्फटिक वेगवेगळ्या क्षेत्रात कसा उपयुक्त आहे याची माहिती प्रदर्शनातून मिळते. वेगवेगळ्या आकारातील आणि रंगातील स्फटिक या प्रदर्शनात बघायला मिळतात. दहाव्या शतकातील गरुडपुराण व १३ व्या शतकातील रसरत्नसमुच्चय या ग्रंथांमध्ये स्फटिकाचे गुणधर्म दिलेले आहे. १९१३ मध्ये स्फटिकांची रचना शोधण्यासाठी विलियम हेन्री ब्रॅग व विलियम लॉरेन्स ब्रॅग यांनी तंत्रज्ञानाचा शोध लावला. त्यासंदर्भात झालेली संशोधने याची विस्तृत माहिती यात आहे. स्फटिकांच्या आकाराचे कन्स्ट्रक्शन, हिरे कसे चमकतात, स्फटिकापासून रत्न कसे तयार होतात याची माहिती प्रदर्शनातून मिळते.युनेस्कोने २०१४ हे वर्ष आंतरराष्ट्रीय क्रिस्टेलोग्राफी वर्ष म्हणून घोषित केले आहे. यानिमित्त राष्ट्रीय विज्ञान संग्रहालयाने स्फटिकांची आश्चर्यकारक दुनिया हे प्रदर्शन बनविले आहे. रमण विज्ञान केंद्रात १२ जानेवारी ते २७ डिसेंबरपर्यंत प्रदर्शन बघता येणार आहे. कोहिनूर १०५.६ कॅरेटकोहिनूर हा जगातील सर्वात मोठा हिरा आहे. जो १०५.६ कॅरेटचा आहे. ज्याचे वजन २१.६ ग्रॅम आहे. या कोहिनूरचा इतिहास व विस्तृत माहिती प्रदर्शनात दिली आहे. स्फटिकाचे आपल्या जीवनात काय महत्त्व आहे, त्याचा इतिहास, ते कसे तयार होतात. त्यांची आकृती, रचना कशी असते, याची संपुर्ण माहिती विद्यार्थ्यांना प्रदर्शनातून मिळते. संशोधनाच्या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांसाठी अतिशय उपयुक्त असे प्रदर्शन आहे.एन. रामदास अय्यर, प्रकल्प समन्वयक, रमण विज्ञान केंद्र

टॅग्स :Raman Science Centreरमण विज्ञान केंद्रnagpurनागपूर