विजेच्या खांबांसह ॲल्युमिनियम तारा लंपास

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 04:12 IST2021-08-12T04:12:22+5:302021-08-12T04:12:22+5:30

बुटीबाेरी : चाेरट्यांनी दुधा शिवारातून विजेचे ११ खांब आणि ९४५ किलाे ॲल्युमिनियम तारा असा एकूण २ लाख ५३ हजार ...

Aluminum wire lamps with electric poles | विजेच्या खांबांसह ॲल्युमिनियम तारा लंपास

विजेच्या खांबांसह ॲल्युमिनियम तारा लंपास

बुटीबाेरी : चाेरट्यांनी दुधा शिवारातून विजेचे ११ खांब आणि ९४५ किलाे ॲल्युमिनियम तारा असा एकूण २ लाख ५३ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल चाेरून नेला. ही घटना साेमवारी (दि. ९) सकाळी उघडकीस आली.

अमाेल विश्वासराव सराेदे, रा.शिवाजीनगर, मूर्तिजापूर, जिल्हा अकाेला यांची बुटीबाेरी (ता.नागपूर ग्रामीण) परिसरातील दुधा शिवारात साइट आहे. तिथे त्यांनी विजेचे साहित्य ठेवले आहे. चाेरट्याने कुणीही नसताना तिथून विजेचे ११ खांब आणि ९४५ किलाे ॲल्युमिनियम तारा चाेरून नेल्या. या साहित्याची किंमत २ लाख ५३ हजार रुपये असल्याचे अमाेल सराेदे यांनी पाेलिसांना सांगितले, शिवाय चाेरी झाल्याचे लक्षात येताच, त्यांनी पाेलिसात तक्रार नाेंदविली. या प्रकरणी बुटीबाेरी पाेलिसांनी अज्ञात आराेपीविरुद्ध भादंवि ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला असून, या घटनेचा तपास पाेलीस उपनिरीक्षक माेरखेडे करीत आहेत.

Web Title: Aluminum wire lamps with electric poles