शहरं
Join us  
Trending Stories
1
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
2
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
3
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
4
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
5
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
6
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
7
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
8
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
9
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
10
IPL 2026: ५ षटकार, ६ चौकार, १६९.७७ चा स्ट्राईक रेट; पंजाबविरुद्ध आयुष म्हात्रेची विस्फोटक इनिंग!
11
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
12
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
13
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
14
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
15
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
16
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
17
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
18
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
19
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
20
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
Daily Top 2Weekly Top 5

पाटीवर मराठीसोबत इतर भाषाही ओके; उर्दू नाव हटविण्यास हायकोर्टाचा नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2024 06:49 IST

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या इमारतीला लावलेल्या फलकावर मराठी व उर्दूमध्ये नगरपरिषदेचे नाव लिहिण्यात आले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : फलकावर स्थानिक प्राधिकरणाचे नाव लिहिण्यासाठी मराठी भाषेचा उपयोग करणे अनिवार्य आहे. पण, अतिरिक्त म्हणून उर्दू वा इतर भाषेचाही  उपयोग केला जाऊ शकतो. याकरिता संबंधित कायदा प्रतिबंध करीत नाही, असे मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठाने एका निर्णयात स्पष्ट केले. न्यायमूर्तिद्वय अविनाश घरोटे व मुकुलिका जवळकर यांनी हा निर्णय दिला.

अकोला जिल्ह्यातील पातूर नगरपरिषदेच्या इमारतीला लावलेल्या फलकावर मराठी व उर्दूमध्ये नगरपरिषदेचे नाव लिहिण्यात आले आहे. त्यापैकी उर्दूमधील नाव हटविण्यासाठी वर्षा बागडे यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरणे (कार्यालयीन भाषा) कायद्यानुसार स्थानिक प्राधिकरणांमध्ये केवळ मराठी भाषेचाच उपयोग करणे बंधनकारक आहे, असे त्यांचे म्हणणे होते. याशिवाय वाशिम जिल्ह्यातील मंगरुळपीर नगरपरिषदेचे नाव मराठीसह उर्दूमध्येही लिहिण्याचा ठराव रद्द करणाऱ्या निर्णयाला सलीमोद्दीन शमशोद्दीन व इतरांनी उच्च न्यायालयात आव्हान दिले होते. या दोन्ही प्रकरणांवर एकत्र सुनावणी करून हा निर्णय दिला गेला. 

उल्लंघन नाही nसंंबंधित कायद्यातील कलम ३ (१) (ए) ते (आय) अनुसार स्थानिक प्राधिकरणाचे पत्रव्यवहार, अर्ज, आदेश, फलक इत्यादीकरिता मराठी भाषेचा उपयोग अनिवार्य आहे. nपरंतु, उर्दू वा इतर भाषेचा अतिरिक्त उपयोग केल्यास या तरतुदीचे उल्लंघन होत नाही, असेही न्यायालयाने निर्णयात नमूद केले.nया निर्णयाद्वारे बागडे यांची याचिका फेटाळण्यात आली, तर सलीमोद्दीन व इतरांची याचिका मंजूर करून उर्दूचा ठराव न्यायालयाकडून कायम ठेवण्यात आला.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूरPaturपातूर