काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात; पीरिपाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घोषणा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2022 20:06 IST2022-10-07T20:04:44+5:302022-10-07T20:06:49+5:30

Nagpur News काँग्रेस सोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.

Alliance with Congress ends; Proclamation at Pirippa's National Gathering | काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात; पीरिपाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घोषणा

काँग्रेससोबतची आघाडी संपुष्टात; पीरिपाच्या राष्ट्रीय मेळाव्यात घोषणा

नागपूर : गेल्या दीड दशकापासून काँग्रेस आघाडीमध्ये मित्रपक्ष म्हणून आम्ही आहोत; परंतु काँग्रेस पक्षाने सन्मानपूर्वक स्थान दिले नाही, आपले राजकीय मित्रत्व जपले नाही. आघाडीचा धर्म पाळला नाही. सातत्याने उपेक्षा केली. त्यामुळे आता काँग्रेस सोबत असलेली आघाडी संपुष्टात येत असल्याची घोषणा पीपल्स रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष माजी खासदार प्रा. जोगेंद्र कवाडे यांनी येथे केली.

यापुढे विश्वासघात करणाऱ्या पक्षासोबत आघाडी न करता आगामी काळातील सर्व निवडणुका स्वबळावर लढविल्या जातील. इतर राजकीय पक्षाकडून सन्मानजनक प्रस्ताव आल्यास आघाडीचा विचारदेखील केला जाईल, अशी भूमिकाही त्यांनी स्पष्ट केली.

 

Web Title: Alliance with Congress ends; Proclamation at Pirippa's National Gathering