शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धव ठाकरे कफनचोर, तुम्ही प्रतिसाद देणार का? देवेंद्र फडणवीसांचा मतदारांना सवाल
2
Controversy : Sanju Samson अम्पायरच्या निर्णयावर नाखूश दिसला, दिल्लीचा मालक out आहे, out आहे! ओरडला
3
वापरा आणि फेकून द्या ही भाजपची वृत्ती; त्यांच्या रेल्वेच्या डब्याला भ्रष्टाचाराची चाके- उद्धव ठाकरे
4
धक्कादायक! पुण्यातील वारजे माळवाडीच्या रामनगरमध्ये हवेत गोळीबार; दुचाकीवर आले होते तीन जण
5
सचिन तेंडुलकरच्या शेजाऱ्यांचे एक ट्विट अन् मग झालं असं काही...; वाचा मुंबईतील घराबद्दलचा किस्सा
6
पत्नीने थंड भाजी दिल्याने पतीने घेतला टोकाचा निर्णय, बिट मार्शल्समुळे वाचला जीव
7
Sanju Samson च्या वादग्रस्त विकेटने मॅच फिरली; DCने बाजी मारून प्ले ऑफची आस कायम राखली
8
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
9
हृदयद्रावक! जळगावमध्ये भरधाव कारने दुचाकीला दिली धडक; आईसह दोन मुले ठार
10
'हमास'च्या समर्थनार्थ पोस्टला लाईक केल्याबद्दल सोमय्या स्कूल व्यवस्थापनाकडून प्राचार्यांचे निलंबन
11
"ज्या-ज्या ठिकाणी चोरलेला धनुष्यबाण आहे, तिथे 'मशाल' जिंकणार"; संजय राऊतांना विश्वास
12
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
13
IPL मध्ये असा गोष्टी घडत असतात...! दिल्लीकडून पराभवानंतर संजू सॅमसनचं विधान चर्चेत 
14
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
15
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
16
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
17
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
18
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
19
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
20
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!

माझ्याविरुद्ध आरोप राजकीय वैमनस्यातून  :  रत्नाकर गुट्टे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 20, 2018 12:34 AM

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यांनी जर हे आरोप सभागृहाबाहेर केले असते तर त्यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकला असता, असा दावा गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्दे ..तर धनंजय मुंडे यांच्यावर दावा ठोकला असता

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी माझ्याविरुद्ध फसवणुकीचा आरोप राजकीय वैमनस्यातून केलेला आहे. त्यांनी सभागृहात आरोप करताना आकडे फुगवून सांगितले असून, ते धांदात खोटे बोलत आहेत. त्यांनी हा आरोप सभागृहात केल्यामुळे मी त्यांच्याविरुद्ध कोणतीही कायदेशीर कारवाई करू शकत नाही. त्यांनी जर हे आरोप सभागृहाबाहेर केले असते तर त्यांच्याविरोधात बदनामीचा दावा ठोकला असता, असा दावा गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी लिमिटेडचे चेअरमन रत्नाकर गुट्टे यांनी गुरुवारी पत्रपरिषदेत केला.गुट्टे म्हणाले, १५ दिवसांपूर्वी गंगाखेडचे आमदार डॉ. मधुसूदन केंद्रे यांनीही माझ्यावर हेच आरोप लावले होते. त्याकरिता त्यांना १५ दिवसांत माफी मागण्यासाठी नोटीस पाठविली आहे. जर त्यांनी माफी मागितली नाही तर त्यांच्याविरोधात ५० कोटी रुपयांचाअब्रुनुकसानीचा दावा ठोकणार आहे. ते म्हणाले, गंगाखेड शुगर अ‍ॅण्ड एनर्जी, सुनील हायटेक इंजिनिअर्स आणि समूहाच्या इतर कंपन्यांनी ५,४६२ कोटी रुपयांचे कर्ज घेण्याचा आरोप धनंजय मुंडे यांनी सभागृहात केला होता. कर्जाचा तपशील देताना गुट्टे यांनी सांगितले की, गंगाखेड साखर अ‍ॅण्ड ऊर्जा लिमिटेडवर १४६६ कोटी ६४ लाख रुपयांचे कर्ज घेतल्याचा दावा मुंडे यांनी केला होता. पण प्रत्यक्षात कारखान्यावर ३६१.४७ कोटी रुपयांचे कर्ज आहे. त्यात ४१.४७ कोटींची बँक गॅरंटी (बीजी) आणि हमीपत्र (एलसी) आहे.त्याचप्रमाणे सुनील हायटेक इंजिनिअर्स लिमिटेडवर १२२.१० कोटींचे कर्ज, ४२५.७१ कोटींची कॅश क्रेडिट, १५०३.०४ कोटींची एलसी व बँक गॅरंटी अशी ही आकडेवारी २०५० कोटी ८५ लाख रुपये एवढी आहे. पण मुंडे यांनी ही थकीत कर्जाची आकडेवारी फुगवून २४१३ कोटी ३२ लाख एवढी सांगितली. याचप्रमाणे सीम इंडस्ट्रीज लिमिटेडच्या बाबतीत मुंडे यांनी सांगितलेल्या ८६.६५ कोटी रुपयांच्या तुलनेत कर्जाची रक्कम १.६५ कोटी रुपये आहे. त्यात सीसी मर्यादा, एलसी व बँक गॅरंटी मर्यादा असे एकूण ६९.६७ कोटी रुपये असल्याचे गुट्टे यांनी स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूरfraudधोकेबाजी